Share

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय खेळाडू तीन आठवडे सुट्टीवर ; माजी कर्णधार भडकला, म्हणला…

Published On: 

🕒 1 min read

इंग्लंड : संपुर्ण देशाचे लक्ष लागुन राहिलेल्या जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्युझीलंडने भारताचा ८ गडी राखुन पराभव करत विजेतेपद पटकावले. चौथ्या डावात भारताने दिलेले १३९ धावांचे लक्ष्य न्युझीलंडने ८ गडी राखुन सहज पार केले. या सामन्यानंतर आता भारतीय संघाला ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात इंग्लंड संघासोबत पाच कसोटी सामन्याची मालिका खेळायची आहे.

इंग्लंड संघासोबतच्या कसोटी मालिकेसाठी बराच वेळ शिल्लक असल्यामुळे भारतीय संघ आता तीन आठवड्यांच्या सुट्टीवर असेल 4 ऑगस्टपासून भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. त्याअगोदर तीन आठवड्यांचा आराम घेऊन खेळाडू 14 जुलै रोजी सरावासाठी परत एकत्र येतील. भारतीय संघाच्या या सगळ्या कार्यक्रमावर माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर भडकले आहेत. हा कार्यक्रम आखण्यापाठीमागचं कारण काय आहे? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

दिलीप वेंगसरकर  म्हणाले, “मला कळत नाही हा कार्यक्रम कोणी आणि कशासाठी बनवला आहे. खेळाडू तीन आठवड्यांच्या सुट्टीवर जाणार आणि पुन्हा येऊन टेस्ट मॅच खेळणार…. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना पार पडल्यानंतर एक आठवड्यांची सुट्टी पुरेशी असते. तुम्हाला जास्त सरावाची गरज आहे. खेळाडूंनी आपला खेळ सुधारणे गरजेचे आहे. तीन आठवडे सुट्टीला मंजुरी कशी मिळाली?, याचं मला आश्चर्य वाटतं”, असं वेंगसरकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!