🕒 1 min read
मुंबई : राज्यामध्ये कोरोनाची आकडेवारी कमी झाल्यानंतर सरकारनं पाच टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल केले होते. मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर काही दिवसातच कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं समोर येत आहे. दरम्यान राज्यात आज 9,677 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 10,138 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता 57,72,799 इतकी झाली आहे. आज 156 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यत सध्या 1,20,715 अॅक्टिव्ह केसेस आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.94 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 156 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2 टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,05,96,965 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60,17,035 (14.82 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,33,748 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,248 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. दरम्यान राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका देखील वाढू लागला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल केले आहेत. आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात राज्य सरकारनं निर्णय जारी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘परमबीर सिंग यांना पदावरून हटवल्यामुळे त्यांनी माझ्यावर खोटे आरोप लावले’
- अनिल देशमुखांना १० बार मालकांनी चार कोटी रुपये दिले ;EDची माहिती
- औरंगाबादेत शुक्रवारी तब्बल १७ हजार जणांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण!
- कौतुकास्पद! औरंगाबादकरांची ‘माझी स्मार्ट बस’ देशात पहिली
- यादीतील उमेदवारांची २०१८ पासून ‘प्रतिक्षा’ संपेना, आझाद मैदानात आंदोलनाचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
