Share

अनिल देशमुखांना १० बार मालकांनी चार कोटी रुपये दिले ;EDची माहिती

Published On: 

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील निवासस्थानी सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) छापा टाकला आहे. शुक्रवारी सकाळी ईडीने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थानी तसंच त्यांच्या निकटवर्तीयांकडे छापे टाकले. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता होती. त्यातच आता EDने अतिशय महत्वपूर्ण खुलासा केला आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणीत चांगलीच वाढ होणार असल्याचे दिसत आहे.

मुंबईतील १० बार मालकांनी अनिल देशमुख यांना तीन महिने चार कोटी रुपये दिल्याचं ईडीच्या तपासात समोर आलं आहे. ईडीने देशमुखांच्या नागपूर, मुंबईसह चार ठिकाणच्या मालमत्तांवर छापेमारीची कारवाई केली. मुंबईमध्ये ईडीचे पथक अनिल देशमुख यांचे खासगी सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांच्या निवासस्थानी सुद्धा शोध घेत आहे. बार मालकांनी देशमुखांना रोख रक्कम दिली. ते पुरावे ईडीने मिळवले असून त्या आधारावर ही कारवाई सुरु आहे.

या प्रकरणाशी संबंधित असलेल्या १० बार मालकांची जबानी ईडीने नोंदवली आहे. ईडी देशमुखांवरील आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांची चैौकशी करत आहे. त्याचप्रमाणे सीबीआय सुद्धा १०० कोटीच्या वसुलीच्या आरोपांची चौकशी करत आहे. अनिल देशमुखांवर त्यांनी बर्खास्त सहाय्याक पोलीस निरीक्षक सचिन वाझेला दर महिन्याला मुंबईतील १७५० बार आणि हॉटेल चालकांकडून महिन्याला १०० कोटींची वसुली करायला सांगितल्याचा आरोप आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!