Share

मंत्रिमंडळातील फेरबदल होणार? एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली आहे. राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाचा विचार सुरू असून ‘वर्षा’ हे मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान या घडामोडींचं केंद्र झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी महाविकास आघाडीतील दिग्गज नेते ‘वर्षा’ इथं दाखल झाले होते.

यासंदर्भात, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातही राजकीय खलबतं झाली. तर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दरम्यान, शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री अनिल परब हेदेखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले होते.

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना मंत्रिमंडळ फेरबदलाविषयी थेट भाष्य करणं टाळलं आहे. ‘मी माझ्या नगरविकास मंत्रालयासंदर्भात भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आलो आहे. इतर घडामोडींबाबत मला काहीच कल्पना नाही. मंत्रिमंडळ फेररचनेसंदर्भात सुरू असलेल्या चर्चेबाबत मी माहिती घेतो,’ अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

अनिल देशमुखांच्या उचलबांगडीवर जयंत पाटील यांचं मोठं विधान ! म्हणाले…

जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनिल देहमुख यांच्या खातेबदला विषयी भाष्य करताना या शक्यता फेटाळून लावल्या आहेत. ‘‘अशा वावड्या उठवण्याची गरज नाही. या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांची काहीही चूक नाहीये. त्यामुळे खांदेपालट करण्याचा प्रश्नच येत नाही. सरकार कोणालाही पाठीशी घालत नसून दोषींना प्रायश्चित्त झालच पाहिजे’ असं भाष्य जयंत पाटील यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!