मुंबई : ज्याप्रमाणे बॉलीवूड कलाकार आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीमागे काही तरी गुप्त योजना असल्याच्या चर्चा असतात त्याच प्रमाणे क्रिकेटर्सच्या देखील जीवनाबद्दल माध्यामांमध्ये चर्चा असतात आता देखील अशीच एका खेळाडूच्या सुट्टी दरम्यान एक बातमी आली आहे. आता भारतीय संघातील आणखी एका मोठ्या खेळाडूचा विवाह झालाआहे.
यामध्ये काही जण गुपचूप लग्न उरकून घेतात तर काही मोठ्या थाटामाटात लग्न करतात. विराट कोहली, युवराज सिंग, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, आर.आश्विन यांचा लग्नसोहळा म्हणजे चाहत्यांसाठी एक आकर्षण होतं. आपल्या भेदक गोलंदाजीने जगभरातील फलंदाजांची दाणादाण उडवणारा भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह आता लग्नबंधनात अडकला आहे.
https://www.instagram.com/p/CMb2BtxHjgD/?utm_source=ig_web_copy_link
बुमराहची होणारी भावी बायको कोण आहे? याबाबत सुरुवातीला दोन नावांची जोरदार चर्चा होती. परंतु या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. कारण बुमराह स्पोर्ट्स प्रेझेंटेटर संजना गणेशन हिच्याशी लगीनगाठ बांधली आहे. सुरुवातीला बुमराहचं नाव दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन हिच्याशी जोडलं जात होतं. या संदर्भात दोघांनीही अद्याप मौन बाळगलं आहे. मात्र, नुकतेच बुमराह याने आपल्या इंस्टाग्राम वरून आपल्या लग्नाचे फोटो शेअर करून यावर शिक्कामोर्तब केल आहे.
बुमराह आणि संजनाने त्यांचे नातेवाईक आणि जवळचे मित्र यांच्यासह खासगी कार्यक्रमात लग्न केले. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा विवाहसोहळा पार पाडला. यामुळे लग्नाच्या कार्यक्रमात अगदी जवळचे लोकच सामील झाले होते. बुमराह आणि संजना गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- वाझे सट्टेवाल्यांकडून खंडणी उकळतो आणि वरुण सरदेसाई त्यातून हिस्सा घेतो – नितेश राणे
- पडळकर फडणवीसांना म्हणाले ‘शेतकऱ्यांचे हृदयसम्राट’; नेटकऱ्यांनी धु-धु धुतले !
- इशान-सूर्याचा मुंबई इंडियन्ससाठी शेवटचा सिझन! वाचा कारण
- महाविकास आघाडी सरकारमध्ये भूकंप, गृहमंत्री बदलाच्या हालचालींना वेग ?
- सचिन वाझे यांच्याशी कनेक्शन जोडत नितेश राणे यांनी गंभीर आरोप केलेले सरदेसाई कोण आहेत ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

