तिरुअनंतपुरम – आगामी काळात पश्चिम बंगालसह केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आसाम या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत.या निवडणुकीचा शंखनादही झाला असून प्रचारसभांना जोर आला आहे. दुसऱ्या बाजूला उमेदवारांच्या याद्यांची घोषणा विविध पक्ष करत आहेत. यातच अनेकांना तिकिटे न मिळाल्याने नाराज असल्याचे दिसून येत आहे.
लतिका सुभाष या केरळ महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा आहेत. त्यांची काही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. ज्यामध्ये त्यांनी आपल्या डोक्याचे केस काढून टाकले आहेत असे दिसत आहे. राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट मिळालं नसल्याची बातमी आहे. त्यामुळे तिरुअनंतपुरममधील पक्षाच्या कार्यालयासमोर मुंडण करत निषेध नोंदविला आहे.
लतिका सुभाष कॉंग्रेसचा राजीनामा देतील अशी शक्यता आहे. त्यांनी इत्तूमनूर मतदार संघातून तिकिट मागितले होते,परंतु त्यांना कॉंग्रेसने तिकीट दिले नाही. नुकतेच नवी दिल्ली येथे पक्षाचे प्रमुख मुल्लाप्पल्ली रामचंद्रन यांनी एप्रिल महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी 86 उमेदवारांची यादी जाहीर केली. यात लतीका सुभाष यांचे नाव यात समाविष्ट नव्हते. याच कारणास्तव कार्यालयाबाहेर निषेध करत त्यांनी हे पाऊल उचलले.
Kerala Mahila Congress chief Lathika Subhash gets her head tonsured in front of the party office in Thiruvananthapuram in protest after being denied the party ticket for Assembly elections.
"I am not joining any party but I'll resign from my post," she says. pic.twitter.com/FWme31IEdU
— ANI (@ANI) March 14, 2021
लतिका सुभाष यांना राहुल गांधी यांनी 2018 मध्ये महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्त केले होते. माध्यमांशी बोलताना त्यांनी कॉंग्रेसवर गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या की,पक्ष महिलांकडे दुर्लक्ष करीत आहे. म्हणूनच मी पार्टी सोडत आहेत. दरम्यान आता त्या अपक्ष म्हणून निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे.
या सर्व प्रकारानंतर मुल्लाप्पल्ली रामचंद्रन यांनी सांगितले की, राहुल गांधी यांना या यादीत नवीन चेहरा हवा आहे आणि तीच यादी जाहीर केली गेली. या निवडणुकीत आमचा पक्ष मोठा विजय मिळवेल असा पूर्ण विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. केरळमधील सर्व 140 विधानसभा जागांवर एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- आमदारांना लॅपटॉप, गरीब विद्यार्थ्यांना का नाही?, भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- पडळकर फडणवीसांना म्हणाले ‘शेतकऱ्यांचे हृदयसम्राट’; नेटकऱ्यांनी धु-धु धुतले !
- होंडाची ‘ही’ अद्ययावत कार लवकरच होणार भारतात देखील लाँच
- …म्हणून आगामी निवडणूकीत कुठल्याही पक्षासोबत युती नाही; मायावतींचा स्वबळाचा नारा
- मराठा आरक्षणासंदर्भात काय होणार? आज महत्वाची सुनावणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

