मुंबई : राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा अक्षरशः थैमान घातले आहे. राज्यात रविवारी तब्बल 16,620 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे, एकूण 1,26,231 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक भागात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तर, काही ठिकाणी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.
मात्र राज्यात दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागणार का ? असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उत्तर दिले आहे. ‘टॅकिंग, ट्रेसिंग, टेस्टिंग या तीन सूत्रांवर आम्ही काम करतोय. सर्व सामाजिक, शासकीय कामांना निर्बंध घातले आहेत. काही ठिकाणी नाईट कर्फ्यू , लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन हा काही पर्याय नाही. आम्ही लॉकडाऊन करणार नाही. मुंबई आणि राज्यात लॉकडाऊन लावण्याचे कारण नाही. पण शिस्त लावण्यासाठी कठोर निर्बंध लावणार’, अशी भूमिका राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, कोरोना रूग्ण संख्या वाढतेय. संसर्ग वाढतोय, ही वाढ मागच्या तुलनेत कमी आहे. मृत्यूदर कमी होतोय, संसर्ग मात्र वाढतोय. सध्या रूग्णालयात बेड उपलब्ध आहे. लसीकरणाच प्रमाण वाढविण्याची गरज आहे. आतापर्यंत 30 लाख लोकांपर्यंत लसीकरण झाले आहे’, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- अनिल देशमुखांच्या उचलबांगडीवर जयंत पाटील यांचं मोठं विधान ! म्हणाले…
- जिल्हाधिकारी, आयुक्तांकडून बाजारपेठत मास्क नसलेल्यांना गुलाब फुल देत गांधीगिरी
- सोयगाव! शहरासह तालुक्यात कडकडीत लॉकडाउन
- कर्नाटक पोलिसांची गुंडगिरी, मराठीत स्टेटस ठेवल्याने युवकांना अमानुष मारहाण
- गंगापुर कोविड केअर सेंटर मधील सुविधांबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले समाधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

