मुंबई : बरीच प्रतीक्षा केल्यानंतर अखेर मुंबई इंडियन्सचे फलंदाज सूर्य कुमार यादव आणि ईशान किशन यांना टीम इंडियाची कॅप घालण्याची संधी मिळाली.
इशान किशन आणि सूर्य कुमार यादव यांनी इंग्लंडविरुद्धच्या दुसर्या टी -२० सामन्यात पदार्पण केले आहे. या दोघांच्या पदार्पणामुळे त्यांची आयपीएल टीम असलेल्या मुंबई इंडियन्सच्या डोकेदुखीत वाढ होणार आहे. हे दोन्ही खेळाडू यंदाच्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सच्या जर्सीत शेवटचं दिसण्याची शक्यता आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत दहा टीम सहभागी होणार असून या आयपीएल पूर्वी मेगा ऑक्शन होणार असल्याचं बीसीसीआयनं यापूर्वीच जाहीर केलं आहे. आयपीएल ऑक्शनच्या सध्याच्या नियमाप्रमाणे प्रत्येक आयपीएल फ्रँचायझी तीन खेळाडूंना रिटेन करू शकते. तर त्यांना एक परदेशी आणि एक अनकॅप (भारताकडून आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला खेळाडू) यांना ‘राईट टू मॅच’ कार्ड वापरुन रिटेन करता येईल.
या नियमाप्रमाणे मुंबई इंडियन्स रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या तीन खेळाडूंना रिटेन करेल. मात्र त्यावेळी इशान किशन आणि सूर्यकुमार यादव हे RTM च्या निकषामध्ये बसत नाहीत. त्यामुळे त्यांना सोडण्याची वेळ मुंबई इंडियन्सवर येऊ शकते.
महत्वाच्या बातम्या
- मंत्री धनंजय मुंडे यांचा बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांना दिलासा
- शहरांनतर धरणांच्या नामांतराचा मुद्दा समोर, ‘या’ प्रकल्पाचे नाव बदलण्याची मागणी
- औरंगाबादेत १०२३ कोरोनाबाधित रुग्णांची नोद, आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या
- विराट फॉर्ममध्ये परतला ; ‘अशी’ कामगिरी करणारा बनला तिसरा कर्णधार
- मराठा आरक्षणासंदर्भात काय होणार? आज महत्वाची सुनावणी


