मुंबई – मुंबईत गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) अटक केली होती. या कारवाईनंतर अखेर सचिन वाझे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
सचिन वाझे प्रकरणावरून भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात ठाकरे सरकारला कोंडीत पकडल्यानंतर आता भाजप आमदार नितेश राणे यांनीही पत्रकार परिषद घेत घणाघाती आरोप केले आहेत.
‘वाझे प्रकरणात शिवसेनेचे युवा नेते वरून सरदसाई यांची भूमिका आहे. त्यामुळे वरून सरदेसाई यांचे फोन रेकॉर्डिंग तपासले जावे,’ अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. राणे यांनी या पत्रकार परिषदेत अनेक धक्कदायक आरोप केले आहेत.
मुंबईत आयपीएलवर बेटिंग घेणाऱ्यांकडून वाझेंनी मागितलेल्या रकमेमधून सरदेसाई यांना आपला हिस्सा मागितला होता, असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला आहे.वझे यांना सरदेसाई यांनी हे फोन कुणाच्या सांगण्यावरून केले? वाझेचे सीडीआर रिपोर्ट, व्हॉट्सअॅप कॉलचे रिपोर्ट असतील. वाझे आणि सरदेसाईमधील संभाषण तपासले पाहिजे. वाझेचं संभाषण तपासणं जमत नसेल तर वरुण सरदेसाईंचं संभाषण NIAने तपासावे अशी मागणी राणे यांनी केली आहे.
दरम्यान, राज्य शासनाने नुकताच नव्या वर्गवारीतील सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय घेतला होता.त्यात प्रामुख्याने युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांचा समावेश केला आहे.तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप नेते चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह मोठ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, हे वृत्त समोर येताच ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठविण्यात आली होती त्यावेळी देखील सरदेसाई चर्चेत आले होते.
कोण आहेत वरुण सरदेसाई?
वरुण सतीश सरदेसाई हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या भगिनीचे पुत्र. वरुण सरदेसाई यांच्याकडे युवासेनेच्या सचिवपदाची जबाबदारी आहे, तसंच वरुण यांच्याकडे शिवसेनेच्या आयटी सेलचीही जबाबदारी आहे. सरदेसाईंनी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी त्यांनी संपादन केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- आमदारांना लॅपटॉप, गरीब विद्यार्थ्यांना का नाही?, भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- पडळकर फडणवीसांना म्हणाले ‘शेतकऱ्यांचे हृदयसम्राट’; नेटकऱ्यांनी धु-धु धुतले !
- इशान-सूर्याचा मुंबई इंडियन्ससाठी शेवटचा सिझन! वाचा कारण
- …म्हणून आगामी निवडणूकीत कुठल्याही पक्षासोबत युती नाही; मायावतींचा स्वबळाचा नारा
- मराठा आरक्षणासंदर्भात काय होणार? आज महत्वाची सुनावणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

