सिंधुदुर्ग: भाजप आणि शिवसेना पुन्हा युती करणार का? असे प्रश्न अनेकदा विचारले जातात. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी तर अनेकदा युबाबत बोलूनही दाखवले आहे. यावरच राज्याचे पर्यावरण मंत्री तथा युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते सध्या कोकण दौऱ्यावर असून यावेळी त्यांना भाजपासोबत पुन्हा मैत्री करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, “तुमच्यावर कोणी अन्याय करत असेल, जोर जबरदस्ती करत असेल तर मैत्री करणार का?”, असा प्रतीसवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
तसेच केंद्रीय यंत्रणा मातोश्रीच्या दरवाजापर्यंत पोहोचल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की,” हे राजकीय षडयंत्र असून ज्या राज्यांमध्ये भाजप सरकार नाही तिथे या गोष्टी सुरु आहेत. न घाबरता या गोष्टीला सामोरं जावं लागणार आहे. टक्कर द्यायला महाराष्ट्र सज्ज आहे. बंगाल, महाराष्ट्र जिथे जिथे यंत्रणा मागे लागत आहेत तिथे तोंडावर पडत आहेत. राजकारण एके ठिकाणी पण जे घाणेरडं राजकारण सुरु आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे. ही महाराष्ट्राची आणि देशाची संस्कृती नाही. लोकं सरकार बनवत असतात, पाडत असतात पण जे नैराश्य येतं त्यातून हे सुडाचं राजकारण सुरु असून महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे.”
दरम्यान यावेळी त्यांनी शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या डायरी प्रकरणावरही भाष्य केले आहे. “अफवांवर किती बोलायचं आणि अधिकृत गोष्टींवर किती बोलायचं यापुरतं मी मर्यादित ठेवतो. सध्या अफवा किती पसरवल्या जात आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. खूप गैरप्रकार सुरु आहे. यंत्रणा तर आहेत पण अफवांच्या बातम्या पाठवल्या जात असून त्यात मी जाणार नाही. अधिकृत गोष्टी समोर येतील. पण बदनामीच्या आणि अफवांच्या मुद्द्यावर मी भाष्य करणार नाही,” असे आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
विराजस–शिवानीने गुपचुप उरकले लग्न? व्हिडीओ होतोय व्हायरल
IPL 2022 : अरेच्चा! लखनऊच्या ‘बेबी एबी’ ने केलेल्या ‘या’ विक्रमाची त्याला साधी कल्पनाही नव्हती
“विखेंना भाजपमध्ये मान मिळतो की नाही…” – छगन भुजबळांचा विखेंना टोला
“…याचे उत्तर ६४० कसं येतं डॉक्टर नितीन राऊत साहेब?”, आधुनिक भास्कराचार्य म्हणत भातखळकरांचा टोला
”मला हे सांगायचं नव्हतं..” विवेक अग्निहोत्रींचा वरुण धवन विषयी मोठा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

