Share

“…याचे उत्तर ६४० कसं येतं डॉक्टर नितीन राऊत साहेब?”, आधुनिक भास्कराचार्य म्हणत भातखळकरांचा टोला

Published On: 

मुंबई: इंधन दरवाढीवरून विरोधी पक्षाने केंद्रातील भाजप सरकारला निशाण्यावर धरले आहे. २०१४ साली ४१० रुपए किंमत असलेले घरगुती सिलेंडर २०२२ साली ९५० झाले. ७ वर्षांत सिलेंडर चे भाव ६४० रुपयांनी वाढवण्यात आले. याचे क्रेडिट घेण्यासाठी ते कधीच पुढे नाही येणार. अशी टीका राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (nitin raut ) यांनी ट्वीट करत केली होती. यावरच आता भाजप नेते अतुल भातखळकर (atul bhatkhalkar ) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

“९५० वजा ४१०, याचे उत्तर ६४० कसं येतं डॉक्टर नितीन राऊत साहेब? विजेची बिलं अशाच मनमानी बेरजा वजाबाक्या करून भरमसाठ पाठवायची सवय लागली आहे तुम्हाला. आधुनिक भास्कराचार्य”, असा टोला अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत लगावला आहे.

दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही इंधन दरवाढीवरूनही केंद्रावर निशाणा साधला असून आज पुन्हा पेट्रोल ३० पैसे, तर डिझेल ३५ पैशांनी वाढले. गेल्या ७ दिवसात इंधनाचे दर ४ रूपयांनी वाढले. निवडणूक असती तर मोदी सरकारने अशी दरवाढ होऊ दिली नसती. भाजपला केवळ सत्ता हवी आहे. जनतेशी देणेघेणे नाही, असा टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या:

“प्रदूषण होणार नसेल तर रिफायनरीला मान्यता देऊ” – आदित्य ठाकरे

“…आता ही अर्थपूर्ण सुबुद्धी कशी काय सुचली बुवा?”, भातखळकरांचा आदित्य ठाकरेंना सवाल

“सातारा येथे केंद्रीय विद्यालय स्थापन करावे”, श्रीनिवास पाटलांची मागणी

अभिनेता शरद केळकरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी,लवकरच…

तारखेत काय ठेवलंय? म्हणत वीरेंद्र सेहवाग म्हणाला, “आजचा दिवस अत्यंत खास…”

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!