Share

”मला हे सांगायचं नव्हतं..” विवेक अग्निहोत्रींचा वरुण धवन विषयी मोठा खुलासा

Published On: 

मुंबई : ‘द काश्मिर फाईल्स’ सिनेमा प्रदर्शिनाआधीपासून ते प्रदर्शनानंतरही अनेक कारणांनी चर्चेत राहिला आहे. ‘प्रोपोगेंडा’ हा शब्द सिनेमाविषयी बॉलीवूडमधनं जास्त बोलला गेला आहे. आता चक्क अशी बातमी कानावर येतेय की विवेक अग्निहोत्री यांनी वरुण धवन विषयी मोठं भाष्य केला आहे. वरुण विषयी बोलताना विवेक अग्निहोत्री यांचे डोळे पाणावले होते.

एका मुलाखतीत विवेक अग्निहोत्री यांनी वरुण धवनविषयी एक खुलासा केला आहे. ते म्हणाले,”मला हे सांगायचं नव्हतं. पण मला ते सांगायची गरज आता वाटत आहे. वरुणनं मला तेव्हा मदत केलीय जेव्हा या जगात कुणीच माझ्या पाठी मदतीसाठी उभं नव्हतं. तो खुप चांगल्या मनाचा आहे. एक अभिनेता म्हणून तो जितका गुणी आहे किंबहुना त्यापेक्षा अधिक एक व्यक्ति म्हणून तो सद्गुणी आहे. मला नेहमी त्याच्याबद्दल वाटतं की त्यानं कायम सुखी असावं आणि यशस्वी देखील व्हावं. मला त्याच्यासोबत सिनेमा करायचा आहे. त्यामुळे त्यानं मला आर्थिक सहकार्य केलं हे सांगायचं नव्हतं. तो मला मदत करेल अशी अपेक्षा मी कधीच केली नव्हती. वरुणविषयी हे सांगाताना विवेक अग्निहोत्री खूप भावनिक झाले होते ”

काही दिवसांपूर्वीच विवेक अग्निहोत्री यांच्या सिनेमासाठी वरुणनं सोशल मीडियावर थम्ब आयकॉन पोस्ट करीत शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानं सिनेमातील कलाकारांचं आणि कलाकृतीचं तोंडभरुन कौतूक आपल्या पोस्टच्या माध्यमातून केलं होतं.

महत्वाच्या बातम्या :

“प्रदूषण होणार नसेल तर रिफायनरीला मान्यता देऊ” – आदित्य ठाकरे

“…आता ही अर्थपूर्ण सुबुद्धी कशी काय सुचली बुवा?”, भातखळकरांचा आदित्य ठाकरेंना सवाल

“सातारा येथे केंद्रीय विद्यालय स्थापन करावे”, श्रीनिवास पाटलांची मागणी

अभिनेता शरद केळकरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी,लवकरच…

तारखेत काय ठेवलंय? म्हणत वीरेंद्र सेहवाग म्हणाला, “आजचा दिवस अत्यंत खास…”

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!