Share

IPL 2022 : अरेच्चा! लखनऊच्या ‘बेबी एबी’ ने केलेल्या ‘या’ विक्रमाची त्याला साधी कल्पनाही नव्हती

Published On: 

नवी दिल्ली: IPL 2022 मध्ये नव्याने सामील झालेले लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या दोन्ही संघांत काल (२८ मार्च) पहिला सामना झाला. मोहम्मद शमीची खतरनाक गोलंदाजी आणि राहुल तेवतियाच्या स्फोटक खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने लखनऊ सुपर जायंट्सचा ५ विकेट्सने पराभव केला. लखनौने प्रथम फलंदाजी करताना 5 गड्यांच्या मोबदल्यात 158 धावा केल्या पण गुजरात संघाने दोन चेंडू बाकी असताना 5 बाद 161 धावा करून सामना जिंकला. या सामन्यात खास ठरला तो नवोदित खेळाडू आयुष बडोनी आणि त्याने केलेला विक्रम.

आयुष बडोनी आयपीएलच्या इतिहासातील पहिला खेळाडू ठरला ज्याने पदार्पणातच 6 व्या क्रमांकावर किंवा त्याखालील फलंदाजी करताना अर्धशतक ठोकले पण त्याने अर्धशतक ठोकले याची जाणीवही त्याला नव्हती. माध्यमांशी बोलताना तो म्हणाला की, “मी धावसंख्या पाहत नव्हतो, मी फक्त फलंदाजी करत होतो. मी माझ्या अर्धशतकाचा विचार करत नव्हतो. मला फक्त माझा नैसर्गिक खेळ खेळायचा होता. मी तिथे पोहोचल्यावरच मी अर्धशतक केल्याची मला जाणीव झाली. मी काल रात्री झोपू शकलो नाही. मी खूप घाबरलो होतो. मी पहिला चौकार मारल्यानंतर मला आत्मविश्वास आला.”

दरम्यान लखनऊचा कर्णधार केएल राहुल (Captain Rahul)आयुष बडोनीच्या (Ayush Badoni) खेळीमुळे खूश होत म्हणाला की, “आयुष बडोनी आमच्यासाठी बेबी एबी (डिव्हिलियर्स) आहे. पहिल्या दिवसापासून तो हुशार होता. नवीन खेळाडूसाठी हे सोपे नव्हते. तो चौफेर शॉट्स खेळतो. मी त्याच्यासाठी खूप आनंदी आहे कारण त्याने संधी साधली. चार विकेट्सनंतर अशी इनिंग खेळणे सोपे नव्हते, पण दबावाखाली त्याने चांगली कामगिरी केली आहे.” आयपीएल सामन्यात शानदार अर्धशतक झळकावणारा आयुष बडोनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीकडून खेळतो. श्रीलंकेविरुद्धच्या अंडर-19 सामन्यातही त्याने 185 धावांची इनिंग खेळली आहे. तर आयुष हा आयपीएल पदार्पणात अर्धशतक करणारा श्रीवत्स गोस्वामी आणि देवदत्त पडिक्कल यांच्यानंतरचा तिसरा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे.

महत्वाच्या बातम्या:

“…याचे उत्तर ६४० कसं येतं डॉक्टर नितीन राऊत साहेब?”, आधुनिक भास्कराचार्य म्हणत भातखळकरांचा टोला

”मला हे सांगायचं नव्हतं..” विवेक अग्निहोत्रींचा वरुण धवन विषयी मोठा खुलासा

“शरद पवारांनी आयुष्यभर आग लावायचेच काम केले”, सदाभाऊ खोत यांचे खळबळजनक वक्तव्य

“प्रदूषण होणार नसेल तर रिफायनरीला मान्यता देऊ” – आदित्य ठाकरे

“…आता ही अर्थपूर्ण सुबुद्धी कशी काय सुचली बुवा?”, भातखळकरांचा आदित्य ठाकरेंना सवाल

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!