मुंबई : मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकार अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे यांनी काही महिन्यांपूर्वीच सोशल मीडियावर रिलेशनशिपची जाहीर कबुली दिली. विराजस आणि शिवानी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकमेकांसोबतचे फोटो नेहमीच शेअर करतात. काही महिन्यांपूर्वीच शिवानीने हातातील अंगठीचा फोटो पोस्ट करत विराजसोबत रिलेशनशिप असल्याचं जाहीर केलं. आता या दोघांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून या दोघांनी गुपचूप लग्न केलं की काय, असा नेटकऱ्यांना वाटत आहे.
या व्हिडीओमध्ये शिवानी आणि विराजस हे वर-वधूच्या पोशाखात पहायला मिळत आहेत.शिवानीने हिरव्या रंगाची काठपदराची साडी नेसली आहे. तर विराजसनेही त्याच रंगसंगतीची शेरवानी आणि जॅकेट परिधान केला आहे. या व्हिडीओमध्ये विराजस शिवानीच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना दिसत आहे. त्यामुळे या दोघांनी लग्न केलं की काय, असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
शिवानी-विराजसचा व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ त्यांच्या लग्नाचा नसून एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यानचा आहे. एका ज्वेलरी ब्रँडसाठी या दोघांनी हे खास शूटिंग केलं असून त्याचाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या :
“विखेंना भाजपमध्ये मान मिळतो की नाही…” – छगन भुजबळांचा विखेंना टोला
“…याचे उत्तर ६४० कसं येतं डॉक्टर नितीन राऊत साहेब?”, आधुनिक भास्कराचार्य म्हणत भातखळकरांचा टोला
”मला हे सांगायचं नव्हतं..” विवेक अग्निहोत्रींचा वरुण धवन विषयी मोठा खुलासा
“शरद पवारांनी आयुष्यभर आग लावायचेच काम केले”, सदाभाऊ खोत यांचे खळबळजनक वक्तव्य
“प्रदूषण होणार नसेल तर रिफायनरीला मान्यता देऊ” – आदित्य ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

