🕒 1 min read
इंग्लंड : जागतिक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेला आज पासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेला अवघे काही तासच उरले आहेत. सगळीकडे या सामन्याची उत्सुकता लागली आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंड दोन्ही संघ साउथहॅमप्टटनमध्ये आहेत. अंतिम सामन्यात कर्णधार विराट कोहलीने सहा बॅट्समन आणि पाच बोलर्सच्या साथीने उतरण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने अनुभवी गोलंदाजांसोबत टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्याचं ठरवलं आहे. तसेच सामन्यापूर्वी विराटने जिंकण्याचा विश्वास दाखवला आहे. आजच्या दिवशी जर टीम इंडिया सामना जिंकली तर मागील इतिहास पुसून टाकू शकते.
कारण, आजच्या तारखेबद्दल एक नविन माहिती समोर आली आहे. भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान १८ ते २२ जुन दरम्यान साउथम्पटन येथे हा सामना होणार आहे. मात्र मागील सहा वर्षात भारताने १८ जुन रोजी तीन सामने खेळले आहेत आणि दुर्दैवाने भारताने तिनही सामने गमावले आहे. सहा वर्षापुर्वी १८ जुन २०१५ रोजी बागंलादेश विरुद्ध एकदिवसीय सामन्यात भारताला ७९ धावांनी पराभुत केले होते. तर १८ जुन २०१६ रोजी झिम्बाब्वे विरुद्धच्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला २ धावांनी पराभव स्विकारावा लागला होता. यानंतर १८ जुन २०१७ साली भारताचा कट्टर विरोधक पाकिस्तान संघाने चॅम्पियनशीप ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात १८० धावांनी पराभव केला होता.
अशा प्रकारे १८ जुन या तारखेला झालेल्या मागील सहा वर्षातील सामन्यात भारतीय संघाला केवळ पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे १८ जुन हा दिवश भारतासाठी अतिशय दुर्दैवी ठरला आहे. या दिवसाचा पराभवाचा इतिहास पुसुन त्यावर विजयाची पताका फडकावेल का याची उत्सुकता क्रिकेट रसिकांना लागली आहे.
महत्वाच्या बातम्या
- जम्मू -काश्मिर मधील विद्यार्थ्यांसाठी अक्षय कुमारने केली ‘इतक्या’ कोटींची मदत
- ‘…हे खेळच सांगेल’ ; WTC फायनलपूर्वी कर्णधार विल्यम्सनने दिला जिंकण्याचा इशारा
- प्रदीप शर्मा यांच्या अटकेनंतर आता आणखी काही बडे मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता?
- संजय राऊतांच्या ‘सर्टिफाईड गुंडा पार्टी’वर अजितदादांचे मोठे विधान…
- टॉस जिंकल्यानंतर भारतीय संघाने ‘हा’ निर्णय घ्यावा ; हवामान पाहता गांगुलीने दिला मोलाचा सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
