इंग्लंड : जागतिक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेला आज पासून सुरुवात होत आहे. सगळीकडे या सामन्याची उत्सुकता लागली आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंड दोन्ही संघ साउथहॅमप्टटनमध्ये आहेत. डब्ल्युटीसीच्या अंतिम सामन्यासाठी काही तसाच राहिले आहे. आज दुपारी ठीक अडीज वाजता विराट आणि केन नाणेफेकीसाठी मैदानात जातील. आतापर्यंतच्या सगळ्यात प्रतिक्षेत असलेली नाणेफेक उडवली जाईल. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंडच्या अंतिम सामन्याला ठीक तीन वाजता होणार आहे.
इतक्या महत्वाच्या सामन्यात टॉस जिंकल्यास भारताने नेमका कोणता निर्णय घ्यायला हवा यासंबंधी भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरभ गांगुलीने सल्ला दिला आहे.
इंडिया टुडेशी बोलताना गांगुलीने सांगितलं आहे. भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचा सल्ला दिला आहे. ढगाळ वातारवण असलं तरी भारताने प्रथम फंलदाजी करावी, कारण परदेश दौऱ्यात भारतीय संघासाठी हे फायद्याचं ठरलं आहे असं गांगुलीने यांनी म्हटलं आहे. ‘दक्षिण आफ्रिकेतील २००२ आणि २०१८ मध्ये आपण प्रथम फलंदाजी केली आणि प्रेशर कमी करुन धावा उभ्या करत सामने जिंकले आहेत’ असंही गांगुलीने यावेळी सांगितलं.
या सामन्यासाठी भारतीय क्रिकेट बोर्डाने या सामन्यासाठी खेळवण्यात येणाऱ्या ११ खेळाडूंची यादी जाहीर केली. अंतिम सामन्यात कर्णधार विराट कोहलीने सहा बॅट्समन आणि पाच बोलर्सच्या साथीने उतरण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने अनुभवी गोलंदाजांसोबत टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्याचं ठरवलं आहे.
कोण आहेत हे ११ शिलेदार ?
विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, आर. अश्विन, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी.
महत्वाच्या बातम्या
- उस्मानाबादेत राष्ट्रवादीला आले उधाण; तीन मोठे नेते दौऱ्यावर
- पहा नेमकं कोण आहेत? सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे कपल
- ‘…तरी न्यूझीलंड संघाला हलक्यात घेऊ नका’ ; दिग्गज फलंदाजाचा भारतीय संघाला सल्ला
- ‘भारतात येताना WTC ट्रॉफी घेऊनच ये’ ; हरभजन सिंगने दिल्या खास शुभेच्छा!
- अजित पवार उस्मानाबाद दौऱ्यावर; माजी आमदार मोटेंची घेणार भेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

