Share

प्रदीप शर्मा यांच्या अटकेनंतर आता आणखी काही बडे मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता?

Published On: 

मुंबई- एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना आज एनआयएने अटक केली आहे. मनसुख हिरण हत्या प्रकरणात पुरावे नष्ट करणे आणि या कटात सहभागी असल्याचा आरोप लावत त्यांना काल एनआयएने अटक केली आहे. शर्मा यांना न्यायालयानं 28 जूनपर्यंत NIA कोठडी सुनावली आहे.

या गुन्ह्यांतील शर्मा यांचा सहभाग स्पष्ट करणारे थेट, परिस्थितीजन्य, तांत्रिक पुराव्यांआधारे त्यांच्याकडे रात्रभर चौकशी करण्यात आली. मात्र, समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्यांना अटक करण्यात आली. याच सुमारास ‘एनआयए’च्या अन्य एका पथकाने सतीश ऊर्फ विकी बाबा आणि मनीष सोहनी या दोन आरोपींनाही अटक केली.

समोर आलेल्या माहितीनुसार, प्रदीप शर्मा यांच्या पीएस फाऊंडेशनमधून काही पुरावे मिळालेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखीन भर पडली आहे. दरम्यान, आता या प्रकरणात शर्मा यांच्या अटकेनंतर आता आणखी काहीजण NIA च्या रडारवर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मनसुख यांच्या हत्येमागे प्रदीप शर्मा मास्टरमाइंड होता. एनआयएकडून अटकेत असलेले विनायक शिंदे, संतोष शेलार आणि आनंद यादव प्रदीप शर्माची माणसं होती. प्रदीप शर्माच्या म्हणण्यावर त्यांनी मनसुख हिरणची हत्या करून त्याची बॉडी डीसपोज केली होती. प्रदीप शर्मा याच्या अटकेनंतर पुन्हा एकदा मनसुख हिरण मृत्यू प्रकरण आणि स्पोटक प्रकरण तापलं आहे. येणाऱ्या दिवसात यामध्ये अजून बडे खुलासे आणि मोठी नावं समोर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडी घडत असताना दुसऱ्या बाजूला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आणखी कोणावर कारवाई होऊ शकते याबद्दल सूचक वक्तव्य केले आहे. सोमय्या म्हणाले,’मनसुख हिरण प्रकरणात ही कारवाई होत असली तरी सचिन वाझे यांनी अनिल परब-प्रदीप शर्मा यांच्याबाबत वसुलीसंबंधी जी माहिती दिली आहे त्यानंतर अनिल परब यांच्या घरीही यंत्रणा पोहोचली तरी मला आश्चर्य वाटणार नाही,’ असं सोमय्या यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंची जी गुंडसेना आहे त्यातील सगळे एकामागोमाग एक जेलमध्ये जाणार आहेत, असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!