Share

जम्मू -काश्मिर मधील विद्यार्थ्यांसाठी अक्षय कुमारने केली ‘इतक्या’ कोटींची मदत

Published On: 

मुंबई : बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांपैकी एक नाव म्हणजे अभिनेता अक्षय कुमार. अक्षय कुमारने या एकपेक्षा एक सुपरहिट सिनेमामध्ये काम केले आहे. त्याचे चित्रपट पाहण्यासाठी त्याचा चाहता वर्ग आतुर असतो, मात्र कोरोनाच्या संकट काळामुळे त्याच्या चित्रपटाचची वाट पहावी लागत आहे. मात्र बॉलिवूडचा हा खिलाडी कुमार उत्तम अभिनेत्यासह तो सामाजिक कार्य देखील करत असतो.

नुकतेच अक्षय कुमारने जम्मू आणि काश्मिरमधील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी शाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्याने तब्बल १ कोटी रुपये शाळा उभारण्यासाठी दान केले आहेत. तसेच तेथील शाळेला हरी ओम भाटीया असं अक्षयच्या वडिलांचं नाव देण्यात येणार आहे.

अक्षय नुकताच जम्मू – काश्मिर दौरा केला होता तिथे त्याने पॅरामिलिटरी फोर्सेसची भेट घेतली. तो हॅलिकॉप्टरने तिथे पोहोचला होता. तेव्हा त्याने जवांनाशी संवाद तर साधलाच शिवाय तेथील स्थानिक गावकऱ्यांशीसोबत चर्चा केली.

काश्मिरच्या भोंडीपोरा जिल्ह्यात तो गेला होता. तेथे अक्षयने जवानांसोबत नृत्यही केलं. त्याचे फोटो सोशल मीडिया शेअर करण्यात आले. बी एस एफ काश्मिरच्या सोशल मीडिया हॅन्डलनेही अक्षयसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

https://www.instagram.com/p/CQN5sOdNfYd/?utm_source=ig_web_copy_link

तसेच अक्षय कुमारचे येत्या काळात एक दोन नव्हे तर तब्बल चार चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘सूर्यवंशी’, ‘बच्चन पांडे’, ‘बेलबॉटम’ आणि त्यानंतर ‘रामसेतू’ या चार धमाकेदार चित्रपटांच्या माध्यमातून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!