इंग्लंड : जागतिक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेला काही तसाच उरले आहेत. सगळीकडे या सामन्याची उत्सुकता लागली आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंड दोन्ही संघ साउथहॅमप्टटनमध्ये आहेत. भारतीय संघाने या महामुकाबल्यासाठी ११ शिलेदारांची घोषणा केली आहे.
अंतिम सामन्यात कर्णधार विराट कोहलीने सहा बॅट्समन आणि पाच बोलर्सच्या साथीने उतरण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने अनुभवी गोलंदाजांसोबत टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्याचं ठरवलं आहे. संघात इशांत शर्मा मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या वेगवान गोलंदाजांना अंतिम सामन्यात खेळण्याची संधी मिळली. तसेच सामन्यापूर्वी विराटने जिंकण्याचा विश्वास दाखवला आहे.
तर फायनल सुरु होण्यापूर्वीच न्यूझीलंडच्या संघाने हार मानल्याचे दिसत आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने एक विधान केले आहे. फायनलपूर्वी विल्यम्सन म्हणाला की, ‘भारत हा एक सर्वोत्तम संघ आहे. भारताचा संघ मजबूत देखील आहे. या संघाने आत्तापर्यंत सातत्याने विजय मिळवले आहेत, त्यामुळेच ते अंतिम फेरीपर्यंत पोहोचले आहेत. दमदार कामगिरीमुळेच ते अंतिम फेरीत पोहोचण्याच्या लायक आहे. त्यामुळे हा सामान चांगलाच रंगेल, अशी मला आशा आहे. या अजिंक्यपदाचा प्रबळ दावेदार नेमका कोण आहे, हे खेळच सांगेल.’
विल्यम्सनने पुढे म्हणाला, ‘न्यूझीलंड संघानेही चांगली प्रगती केली आहे. संघापुढे बरीच आव्हानं आली तीही आव्हान आम्ही पार करत फायनलपर्यंत पोहोचलो आहोत. सध्याच्या घडीला आम्ही चांगल्या फॉर्ममध्ये आहोत आणि हाच फॉर्म आम्हाला फायनलमध्येही कायम ठेवायचा आहे.
महत्वाच्या बातम्या
- उस्मानाबादेत राष्ट्रवादीला आले उधाण; तीन मोठे नेते दौऱ्यावर
- पहा नेमकं कोण आहेत? सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे कपल
- ‘…तरी न्यूझीलंड संघाला हलक्यात घेऊ नका’ ; दिग्गज फलंदाजाचा भारतीय संघाला सल्ला
- ‘भारतात येताना WTC ट्रॉफी घेऊनच ये’ ; हरभजन सिंगने दिल्या खास शुभेच्छा!
- अजित पवार उस्मानाबाद दौऱ्यावर; माजी आमदार मोटेंची घेणार भेट


