Share

संजय राऊतांच्या ‘सर्टिफाईड गुंडा पार्टी’वर अजितदादांचे मोठे विधान…

Published On: 

जालना : अयोध्येतील राम मंदिराच्या ट्रस्टने जमीन घोटाळा केल्याच्या आरोपामुळे देशभरात खळबळ उडाली होती. याच मुद्यावरून सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला होता. त्यामुळे काल भाजप युवा मोर्चाच्या वतीने शिवसेना भवनावर ‘फटकार’ मोर्चा काढला होता. यावेळी शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच धुमश्चक्री उडाली.

भाजपने शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढून निषेध करणार होते. भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चेकरी जमा झाल्यानंतर शिवसैनिकांनी शिवसेना भवनाच्या परिसरात गर्दी केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरवातीला बाचाबाची झाली नंतर याच रुपांतर हाणामारीत झाले.

त्यानंतर यावरून आता जोरदार राजकारण तापायला सुरवात झाली आहे. दरम्यान, या वादावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील आपली रोखठोक प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे. मराठा माणसांच्या अस्मितेसाठी आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत, असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.

यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘कोणी काहीही बोलतं, कुठलाही पक्ष स्वतः गुंड म्हणून घेणार नाही. आज राज्याचे प्रमुख शिवसेनेचे नेते आहेत. कायद्याने राज्य चालवणं, नियमाने काम चालवणं, सगळ्यांना सोबत घेऊन काम करणं असं काम मुख्यमंत्री करत आहेत’.असं अजित पवार म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते संजय राऊत ?

‘होय, शिवसेना गुंडगिरी करते. मात्र, सत्तेचा माज शिवसेना करते हे चुकीचं आहे. सत्तेचा माज असता तर काल अजून वेगळा राडा झाला असता. शिवसेना भवन हे मराठा माणसासाठी, राज्यासाठी अस्मितेचं स्थान आहे. याच भवनात बसून बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रावर राज्य केलं. त्या वास्तूच्या दिशेने कोणी चालून आलं तर होय, आम्ही गुंड आहोत. आम्ही गुंड आहोत यासाठी आम्हाला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या बाबतीत, हिंदुत्वासाठी आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत. त्यावेळी मराठी माणसाने केंद्रविरोधात गुंडगिरी केली म्हणून मुंबई महाराष्ट्रात राहिली,’ असं संजय राऊत यांनी आवर्जून नमूद केलं.

पुढे त्यांनी तुकाराम महाराजांच्या काही ओळी देखील सांगितल्या. ‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा असं तुकारामांनी सांगितलंय. ही गुंडगिरी आम्ही करत राहिलो म्हणून महाराष्ट्रात आणि मुंबईत मराठी माणसाचा आवाज आहे. तो आवाज दाबाल तर गुंडगिरी करणार. विरोधकांना आंदोलनाचा हक्क आहे, पण आमच्या श्रद्धास्थानाकडं वाकडी नजर टाकलीत तर असंच होईल. त्यामुळे शिवसेना भवनाबाहेर कोणीही आंदोलन करायचं नाही. शिवसेना भवन अपवाद आहे.’ असं देखील राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!