Share

लवकरच वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा सादर करणार; नवाब मलिकांचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: क्रुझ ड्रग्स आणि आर्यन खान प्रकरणात अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच समीर वानखेडे यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक खुलासे मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे. त्यातच आता नवाब मलिक यांनी पुन्हा एक ट्वीट करत इशारा दिला आहे.

समीर दाऊद वानखेडे आणि डॉ. शबाना कुरेशी असे ट्वीट करत नवाब मलिक यांनी त्यांच्या लग्नाचा निकाहनाम लवकरच प्रसिद्ध करणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान ७ डिसेंबर २००६  रोजी मुंबई येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स मध्ये समीर वानखेडे आणि डॉ. शबाना कुरेशी निकाह केल्याचेही मलिकांनी म्हटले आहे. तसेच मेहेर म्याहणून ३३ हजार घेण्यात आले असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी निकाहनामाचाही एक फोटो ट्वीट करत तो लवकरच सदर करणार असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान नवाब मलिक रोज काही न काही खुलासे करत आहेत. त्यामुळे आर्यन खान ड्रग्स प्रकरणाने आता एक वेगळेच वळण घेतले आहे. यामुळे विरोधी पक्षाकडून मलिक यांच्यावर टीकाही केली जात आहे. आता आज ते पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेणार आहेत. यात ते काय नवीन खुलासा करणार याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!