Share

नवाब मलिकांनी वानखेडेंचा ‘स्वीट कपल’ फोटो केला ट्वीट; दिला ‘हा’ इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज पुन्हा एक ट्वीट करत खळबळ माजवली आहे. नवाब मलिकांनी समीर वानखेडेंच्या पहिला लग्नाचा फोटो ट्विट करत इशारा दिला आहे. या फोटोत नवाब मलिकांनी म्हटलं आहे स्वीट कपलचा फोटो समीर दाऊद वानखेडे आणि डॉ. शबाना कुरेशी.

यासोबतच त्यांनी समीर दाऊद वानखेडेच्या पहिल्या लग्नाचा निकाह नामा लवकरच सादर करणार असल्याचेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे. ७ डिसेंबर २००६  रोजी मुंबई येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स मध्ये यांनी निकाह केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान आज सकाळी पुन्हा एकदा नवाब मलिक पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी हे ट्वीट केले आहे. त्यामुळे आता ते पत्रकार परिषदेत काय गौप्यस्फोट करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान यावेळी नवाब मलिक यांनी मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी समीर दाऊद वानखेडेचा जो मुद्दा उघड करत आहे तो त्यांच्या धर्माचा नाही. तर ज्या फसव्या मार्गाने त्यांनी IRS ची नोकरी मिळवण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र मिळवले आहे आणि एका पात्र अनुसूचित जातीच्या व्यक्तीला वंचित ठेवले आहे ते मला समोर आणायचे असल्याचे त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!