मुंबई : राज्य परिवहन अर्थात एसटी महामंडळानं आपल्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवांसाठी 17.17 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. काल मध्यरात्री पासून ही भाडेवाढ लागू झाली. भाडेवाढीचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी तयार करण्यात आला होता मात्र त्याला मंजुरी मिळाली नव्हती. काल संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आणि लगेचच ही भाडेवाढ लागू करण्यात आली.
ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केलं आहे अशा प्रवाशांकडून वाहक सुधारित तिकिटाच्या रक्कमेची आकारणी करतील, असंही महामंडळानं स्पष्ट केलं आहे. नव्या तिकिट दरवाढीनुसार साधी गाडी, शयन-आसनी, शिवशाही तसेच शिवनेरी आणि अश्वमेधच्या पहिल्या टप्प्यासाठी भाडेवाढ होणार नसून दुसऱ्या टप्प्यानंतर म्हणजेच 6 किमी नंतर तिकिटाच्या दरात वाढ होणार आहे. ही दरवाढ पाच रुपयाच्या पटीत असणार आहे.
इंधनाचे भरमसाट वाढलेले दर, टायरच्या तसेच गाड्यांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किमतीमुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीवर पडलेला भार कमी करण्यासाठी एसटी महामंडळाकडे भाडेवाढ करण्याशिवाय पर्याय नव्हता. भाडेवाढीचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी तयार करण्यात आला होता, मात्र त्याला मंजुरी मिळाली नव्हती. सोमवारी मंजुरी मिळाल्यानंतर भाडेवाढीचा निर्णय लागू करण्यात आला आहे.
एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, वाढत्या इंधनाचा भार पेलत असताना दुसरीकडे महामंडळाच्या तिजोरीवरही त्याचा परिणाम जाणवू लागला असल्याने नाइलाजास्तव ही तिकीट दरवाढ करण्यात आली. ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे, अशा प्रवाशांकडून नव्या दरानुसार दरातील फरकातील रकमेची आकारणी केली जाईल, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सोशल मीडियावर खेळ खेळत बसण्यापेक्षा पुरावे द्या’; क्रांतीचे मलिकांना प्रत्युत्तर
- ‘गृहमंत्री काश्मीरमध्ये असताना पाकिस्तानचा विजय आणि भारताचा पराभव साजरा’ संजय राऊतांचे टीकास्त्र
- नवाब मलिक लवकरच रिलीज करणार ‘स्पेशल २६’
- समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ रिपब्लिकन पक्षाचे उद्या करणार आझाद मैदानात आंदोलन
- चंद्रकांत पाटील यांचे विधान म्हणजे उच्च दर्जाची मनोरंजन सेवा- प्रदीप देशमुख


