नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. काही देशामध्ये कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे. तर काही ठिकाणी त्याचे साईड इफेक्ट्स देखील समोर आले आहेत.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुप्रतीक्षित असलेल्या सीरमच्या लसीला भारतात लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. इंग्लंडने या लसीच्या वापराला मान्यात दिल्यानंतर तासाभरातच या घडामोडींना वेग आला. सीरमने या लसीच्या भारतात चाचण्या घेतल्या होत्या.
दरम्यान, गेल्या महिन्यातच सीरम इन्स्टिट्युटने लसीच्या आपातकालीन वापराला परवानगी मिळावी म्हणून अर्ज केला होता. सीरमच्या या अर्जावर भारतीय औषध नियंत्रक यंत्रणेने नेमलेल्या विशेष तज्ज्ञ समितीची बैठक सुरु आहे. या बैठकीत सीरमच्या लसीला मान्यता देण्याचा निर्णय होऊ शकतो.
एकदा या लसीच्या वापराला मान्यता मिळाली की त्याच्या निर्यातीला जागतिक आरोग्य संघटनेची पात्रतापूर्व परवानगी मिळू शकेल. मात्र त्यासाठी महिन्याचा कालावधी लागू शकेल, ते देशासाठी लाभदायक ठरेल.
महत्वाच्या बातम्या
- कमला हॅरिस यांनी घेतली कोरोना लस; लसीकरणानंतर म्हणाल्या…
- भुजबळ, वडेट्टीवारांच्या पाठीशी बारा बलुतेदार, गरज पडली तर रस्त्यावर उतरु : प्रकाश शेंडगे
- रोहित तिसऱ्या कसोटी टेस्टमध्ये खेळणार की नाही? रवी शाश्त्री यांनी केला खुलासा
- ‘पुनावाला यांचे कार्य हे महाराष्ट्राचे व देशाचे नाव उंचावणारे, त्यांना महाराष्ट्र भूषण द्यावा’
- व्होडाफोन आयडिया ने आणला प्रीपेड यूजर्ससाठी खास प्लान !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
