Share

भुजबळ, वडेट्टीवारांच्या पाठीशी बारा बलुतेदार, गरज पडली तर रस्त्यावर उतरु : प्रकाश शेंडगे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेला असताना आता मराठा आंदोलकांनी महाविकास आघाडी मधील मंत्री छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवारांची मंत्रीमादालातून हकालपट्टी करा अशी मागणी नुकतीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे.

हे दोन्ही नेते ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करत असून त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे.

हे दोन्ही नेते सातत्याने चुकीची विधाने करून दोन्ही समाजाची दिशाभूल करत आहेत. हे दोन्ही नेते ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे.

दरम्यान, आता ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी या मागणीवर अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. TV9 मराठीशी बोलताना भुजबळ आणि वडेट्टीवार यांच्या समर्थनार्थ संघर्ष करण्यास तयार असल्याचे सांगितले.

छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवर मराठा आणि ओबीसी अशा दोन्ही समाजाची बाजू मांडत आहे. पण मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करण्याची भाषा कुणी करत असेल तर आम्ही त्याविरोधात संघर्ष करु. ओबीसी आणि बारा बलुतेदार त्यांच्यासोबत ठामपमे उभा आहे. गरज पडली तर आम्ही सगळे वडेट्टीवार आणि भुजबळ यांच्यासाठी रस्त्यावर उतरुन संघर्ष करु” असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!