Share

कमला हॅरिस यांनी घेतली कोरोना लस; लसीकरणानंतर म्हणाल्या…

Published On: 

वॉशिंग्टन : जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. काही देशामध्ये कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे. तर काही ठिकाणी त्याचे साईड इफेक्ट्स देखील समोर आले आहेत

याच दरम्यान, अमेरिकेत कोरोना लसीसंदर्भात वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्याचे साईड इफेक्ट देखील समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेतील प्रतिष्ठित व्यक्ती लस टोचून घेत आहेत. कोरोना लस टोचून घेण्यासाठी अमेरिकी नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी हे करण्यात येत आहे.

याच अभियानाचा भाग म्हणून अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी मंगळवारी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. विशेष म्हणजे याचं टीव्हीवरून थेट प्रक्षेपणही करण्यात आलं.

साउथईस्ट वॉशिंग्टनमधील मेडिकल सेंटरमध्ये कमला हॅरिस यांनी कोरोना लसीचा डोस घेतला.”मला काहीच त्रास झाला नाही. ही लस सुरक्षित आहे. आपलं रक्षण करते आणि ती घेताना फारसं दुखतही नाही, त्यामुळे प्रत्येकाने ही लस घ्यावी असं मी आवाहन करते”असं कमला हॅरिस यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!