मेलबर्न : सिडनी शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या आयोजनावर शंका निर्माण झाली होती. सिडनीतील कसोटी सामना इतरत्र हलविण्याची तयारी देखील सुरु झाली होती.
मात्र, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नुकत्याच दिलेल्या वृत्तानुसार सिडनीतील परिस्थती नियंत्रणात आहे. त्यामुळे सिडनी क्रिकेट मैदानावरील तिसऱ्या कसोटी सामन्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सात जानेवारीपासून तिसरा कसोटी सामना होणार आहे. त्यानंतर अखेरचा व चौथा कसोटी सामना हा ब्रिस्बेन येथे १५ जानेवारीपासून खेळवण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून सिडनीमध्ये कोरोना रुग्ण वाढल्याचे दिसून येत आहे. व हिटमॅन रोहित शर्मा देखील काही दिवसांपासून सिडनीमधील एका हॉटेलमध्ये क्वारंटाइन आहे. व रोहित शर्मा 4 टेस्ट मॅच मध्ये खेळणार का नाही यावर प्रश्न उपस्थित होत होते. पण आता रोहित खेळणार असल्याचं भारतीय टीमचे मुख्य प्रशिक्षक रवी शाश्त्री यांनी खुलासा केला आहे.
तिसऱ्या टेस्टमध्येही जबाबदारी बॉलरवरच असेल, असं टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले आहेत. आम्ही तिसऱ्या टेस्टमध्येही 5 बॉलर घेऊन मैदानात उतरू. रोहित शर्मा बुधवारी टीमसोबत येईल. तो किती फिट आहे, ते पाहावं लागेल. क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर त्याला कसं वाटत आहे, ते पाहूनच निर्णय घेतला जाईल, असं शास्त्रींनी स्पष्ट केलं.
महत्वाच्या बातम्या
- धोका पुन्हा वाढला : 2 वर्षांच्या चिमुकलीमध्येही आढळला कोरोनाचा नवा स्ट्रेन
- महाआघाडी सरकारने महिलांच्या विषयात तरी राजकारण करू नये- भाजपा
- शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा व परिसर सॅनिटाइज करा : नीलम गोऱ्हे
- शेतकरी आंदोलनावरून कुमार विश्वास यांनी साधला मोदि सरकारवर निशाणा
- ‘ईडी कार्यालयात आज हजर होणार होतोच मात्र कोरोना सदृश लक्षणांमुळे विश्रांतीची गरज आहे’


