🕒 1 min read
मुंबई : ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या दुसऱ्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रसार अतिशय वेगाने होत असल्याचे त्यांच्या निष्कर्षावरून स्पष्ट होत आहे. यामुळेच केंद्रासह राज्य सरकारने देखील खबरदारी बाळगली आहे.
दुसरीकडं, कोरोना लसींबाबत दिलासादायक वृत्त हाती येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासह हैद्राबाद व अहमदाबादमधील लस संशोधन करणाऱ्या कंपन्यांच्या दौऱ्यानंतर प्रशासनाला लसीकरणाच्या तयारीचे निर्देश देण्यात आले होते. लसीकरणाची अंतिम तयारी प्रशासनाकडून पूर्ण झाली असून सद्या केंद्र सरकारच्या परवानगीची मिळणे आवश्यक आहे.
ब्रिटीश सरकारकडून ऑक्सफर्ड आणि एस्ट्राझेन्का लशीच्या वापराला मान्यता देण्यात आली आहे. या दोन्ही लसींना ब्रिटनमध्ये परवानगी मिळाल्यानंतर भारताला देखील आपल्या पहिल्या लसीची चाहूल लागली आहे. ऑक्सफर्ड सोबत मिळून सिरमने लस बनवली असल्याने यामुळे जगभरात भारताचा डंका वाजणार आहे. त्यामुळेच मनसेने सिरमच्या प्रमुखांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
‘सायरस पुनावाला हे सिरम इन्स्टिट्युटच्या माध्यमाने गेली अनेक दशके विविध रोगांवर लस उपलब्ध करून देत आहेत. या महामारीत सुद्धा पूर्ण जगाला त्यांनी लसीचे मोठया प्रमाणात उत्पादन करून मोठा दिलासा दिला आहे. पुनावाला यांचे कार्य हे महाराष्ट्राचे व देशाचे नाव उंचावणारे असेच आहे. असे भूषणावह कार्य करणाऱ्या सायरस पुनावाला यांना “महाराष्ट्र भूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे हि विनंती.’ असे ट्विट मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केले आहे.
असे भूषणावह कार्य करणाऱ्या सायरस पुनावाला यांना "महाराष्ट्र भूषण" पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे हि विनंती.
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) December 30, 2020
महत्वाच्या बातम्या
- धोका पुन्हा वाढला : 2 वर्षांच्या चिमुकलीमध्येही आढळला कोरोनाचा नवा स्ट्रेन
- खुशखबर ! अॅमेझॉन च्या ‘मेगा सॅलरी डेज’ सेल मध्ये ‘या’ वस्तूंवर मिळणार ५०% सूट
- ‘ईडीची नोटीस आली की महाविकास आघाडीचे नेते चिखलात ढकलुन दिल्यासारखं ओरडतात’
- येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत शांततेने व साधेपणाने साजरे करा – अनिल देशमुख
- ‘ईडी कार्यालयात आज हजर होणार होतोच मात्र कोरोना सदृश लक्षणांमुळे विश्रांतीची गरज आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
