Share

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी संजय राठोड पुन्हा मंत्रीमंडळात येणार ?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- 22 वर्षीय पूजा चव्हाणचा वानवडी येथे संशयास्पद मृत्यू झाला आहे. शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचं पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानंतर विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत राठोडांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर राठोडांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे राजीनामा सोपावला होता. मात्र, राठोड यांचा राजीनामा अद्याप राज्यपालांकडे पोहोचलाच नसल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, एका बाजूला राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत असले तरीही वास्तविक चित्र काही वेगळेच असल्याची चर्चा सुरु झाली आहे. संजय राठोड यांचा राजीनामा अजून राज्यपालांकडे पाठवलाच नसल्याची माहिती समोर येत आहे. तीन दिवस उलटले तरी संजय राठोड यांचा राजीनामा अजून मुख्यमंत्र्यांकडेच आहे का? असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.

दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राजीनामा दिलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे अजुनही मंत्रीमंडळात आहेत का ? त्यांच्याकडे कोणती जबाबदारी आहे ? त्यांचे सध्याचे अस्तित्व काय आहे ? विरोधकांना शांत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी फक्त राजीनामा घेऊन आपल्याकडे ठेवला आहे का ? अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीमंडळात घेण्याचा सरकारचा डाव आहे का ? याची आता शंका येऊ लागल्याचा प्रश्न प्रवीण दरेकर यांनी विचारला आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री संजय राठोड यांना शेवटच्या दिवशी मंत्री ठेवण्याचा हा पूर्वनियोजित डाव असल्याची टीका दरेकर यांनी केली आहे.

दरम्यान, रविवारी संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी विचारणा केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की, राजीनामा फ्रेक करुन लावण्यासाठी घेतला नाही. मात्र संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे अद्याप पोहोचलेला नसल्याची चर्चा आहे.यामुळे कायदेशीरदृष्ट्या संजय राठोड वनमंत्री पदावर कायम आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!