🕒 1 min read
मुंबई : संजय राठोड यांचा पूजा चव्हाणच्या मृत्यूशी संबंध असल्याचा आरोप भाजपने केला आहे. यात भाजप नेत्या चित्रा वाघ आघाडीवर होत्या. चित्रा वाघ यांनी नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवारांबद्द्लचा आदर व्यक्त केला होता.
‘आज मला पवार साहेबांची फार आठवण येत आहे. २०१७ मध्ये जेव्हा पहिली एफआयआर दाखल झाली तेव्हा शरद पवारांनी मला बोलावून घेतलं. तो बापच आहे माझा असे बोलल्या होत्या.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीट केले होते , ते म्हणाले होते कि, “वाघाची ” डरकाळी व्याघ्रवाड्यात अधिक उठावदार दिसत होती पण कळपात गेल्यावर व्याघ्र डरकाळी सुद्धा हवेत कशी विरून जाते हे ही आज प्रत्यक्ष अनुभवले. शेवटी सिंहाच्या तालमीतील वाघ उरले केवळ नावापुरते…’अशी टीका मिटकरी यांनी केलेली आहे.
"वाघाची " डरकाळी व्याघ्रवाड्यात अधिक उठावदार दिसत होती पण कळपात गेल्यावर व्याघ्र डरकाळी सुद्धा हवेत कशी विरून जाते हे ही आज प्रत्यक्ष अनुभवले. शेवटी सिंहाच्या तालमीतील वाघ उरले केवळ नावापुरते…
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 25, 2021
यावर चित्रा वाघ यांनी अमोल मिटकरी यांचा चांगलाच समाचार घेतलेला आहे. त्या म्हणाल्या कि, ‘अमोल मिटकरी भावा तू आता आला आहे. तुला काय माहिती? तुला आमदारकी दिली आहे पक्षाने, नेटाने काम कर. चांगला आवाज आहे बोलत राहा. बाकी माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, बापालाच जाऊन विचार, साहेबांना विचार, ते सांगतील. यावर बोलून फार महत्त्व देण्याची गरज नाही” असं चित्रा वाघ म्हणाल्या.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सायबर गुन्हे विभागाच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांची भेट घेतली. फोटो मॉर्फिंग प्रकरणी वाघ यांनी बीकेसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानंतर त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
महत्त्वाच्या बातम्या
- उन्हाळ्यात कोकम सरबत पिण्याचे भरपूर फायदे
- बीडच्या वेअर हाऊसमध्ये अग्नितांडव! तब्बल ७५ कोटींचे नुकसान
- ‘टेस्ट करण्यापेक्षा व्यापाऱ्यांना कोरोना लस द्या’
- हिंगोलीत जिल्ह्यात ७ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर; बाहेरगावहून आलेले ४ प्रवासी पॉझिटिव्ह
- पंकजा मुंडेंच्या आक्रमक पवित्र्यानंतर धनंजय मुंडेंची मंत्रीपदासोबत आमदारकी जाऊ शकते का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
