औरंगाबाद : कन्नड सोयगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी विभागीय आयुक्तालयात निवेदन देण्यासाठी बैलगाडीतून प्रवास केला. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवले आणि बैलगाडीमधून विभागीय आयुक्तालयात जाता येणार नसल्याचे सांगितले. यामुळे हर्षवर्धन जाधव हे तीन-चार कार्यकर्ते घेऊन निवेदन देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात गेले.
कन्नड सोयगाव मतदारसंघातील आणेवारी पन्नास पैशाच्या आत असल्यामुळे ३ नोव्हेंबर २०१५ च्या राज्य शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे विविध आठ उपयोजनाचा लाभ देण्यात यावा अशा मागणीचे निवेदन या वेळी जाधव यांनी विभागीय आयुक्तांना दिले. २०२० ची आणेवारी पन्नास पैशाच्या आत लागल्यामुळे आमच्या पिकांचे नुकसान ३३ टक्के पेक्षा जास्त आहे. त्यामुळे नियमावली प्रमाणे शेत पिकाचे नुकसान भरपाईची रक्कम त्वरित देण्यात यावी अशी मागणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे.
पीक विमा देण्याच्या संदर्भात कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी खासगी विमा कंपनीसोबत संगनमत करून पीक कापणी अहवाल चुकीचा आणि वेगळा दिल्याचे निदर्शनात आले आहे. त्यामुळे सदर अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी व राज्य शासनाने खरीप २०२० ची १५ डिसेंबर रोजी जाहीर केलेल्या आणेवारी प्रमाणेच पिक विमा आम्हास प्रदान करण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. कृषी खात्याने एकाच मंडळाचे दोन वेगवेगळे पीक कापणी अहवाल कसे दिले याबाबत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. एम.ई.आर.सीच्या वीज वितरण मंडळा बरोबर झालेल्या कराराप्रमाणे ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील डीपी खराब झाले आहे, ती डीपी ४८ तासात बदलून मिळावी अशी मागणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- काळजी घ्या! ‘या’ ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता
- दृष्टचक्र! पन्नास रुपये किलो विकणारा टोमॅटो मिळतोय अवघ्या पाच रुपयांत
- ‘राष्ट्रवादीचे आ.संदिप क्षीरसागर यांचे राजकारण स्वार्थी’
- लस घेतल्यानंतरही बीडच्या आरोग्य अधिकाऱ्यांना कोरोना
- बीडच्या वेअर हाऊसमध्ये अग्नितांडव! तब्बल ७५ कोटींचे नुकसान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

