Share

महाविकास आघाडी नव्हे, हे तर निजामी सरकार-संभाजी पाटील निलंगेकर

Published On: 

लातूर: अर्थसंकल्प अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. दरवर्षी अधिवेशन वेगवेगळ्या विषयांमुळे गाजत असते. विरोधक सत्ताधार्यांना घेरण्याचा अतोनात प्रयत्न करीत असतात. यावेळी सुद्धा विरोधक वेगवेगळ्या पद्धतीने सरकारला घेरण्याचा प्रयत्न करीत आहेत. नुकतेच संभाजी पाटील निलंगेकर यांनी सभागृह मध्ये बोलताना लातूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सरकण्याचा वादावरून सरकारला घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना सभागृहात बोलू न दिल्यामुळे त्यांनी समाज माध्यमांवर पोस्ट शेअर करत ही राज्य सरकार निजामी सरकार असल्याचे टीका केली.

समाज माध्यमांवर केलेल्या पोस्ट मध्ये त्यांनी सरकारला खडेबोल सुनावले. “महाराष्ट्र सरकार हे निजामी सरकार आहे, जनता राजा शिवाजी महाराजांचा विषय विधानसभेत मांडू दिला जात नाही. हा संपूर्ण महाराष्ट्राचा अवमान आहे.” अशा शब्दात त्यांनी राज्य सरकार वर टीका केली. या मुद्द्यावर येणाऱ्या काळात वाद वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

नेमके प्रकरण काय ?
लातूर येथील रायवाडी येथे सार्वजनिक वर्गणीतून २०१६ मध्ये नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती पुतळा उभारण्यात आला होता. स्थानिक पातळीवर सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करत हा पुतळा उभारला असतांना सुद्धा २५ फेब्रु. २०२१ रोजी हा पुतळा तहसीलदार व स्थानिक प्रशासनाने हटवण्याचे काम केले. यावेळी स्थानिक गावकऱ्यांनी पुतळा राहू देण्याची विनवणी केल्या नंतर सुद्धा पुतळा हटवण्यात आला. त्यामुळे पुतळा हटवण्याचा आदेश तपशीलदारांना कोणी दिला? असा प्रश्न विचारल्या जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!