परभणी : गेल्या अनेक वर्षांपासून सोनपेठ येथील क्रीडा संकुलाचा प्रश्न प्रलंबित असून लवकरच याठिकाणी क्रीडा संकुल उभे राहणार आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश वरपुरडकर यांनी क्रीडा मंत्री सुनील केदार यांची मुंबईत भेट घेतली आहे.
सोनपेठ तालुक्यातील खेळाडूंसाठी तालुक्यात क्रीडा संकुल नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून खेळाडूंची गैरसोय होत आहे. राज्य सरकारने प्रत्येक तालुक्यातला क्रीडा संकुल देण्याचे धोरण आखले आहे. मात्र, सोनपेठला अद्याप क्रीडा संकुल मिळालेले नाही. जागा आणि निधीची अडचण असल्यामुळे हे क्रीडा संकुल रखडलेले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार वरपुडकर यानी पुढाकार घेत क्रीडा मंत्री सुनिल केदार यांची मंगळवारी मुंबईत भेट घेतली.
यावेळी क्रीडा मंत्री सुनिल केदार यांनी सोनपेठ येथील क्रीडा संकुलासाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन दिले. सोनपेठ येथील क्रीडा संकुलाचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्यात येईल, असे वरपुडकर यांनी सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधानांना स्पीड पोस्टने पाठवल्या गोवऱ्या; गॅस दरवाढीचा निषेध
- औरंगाबाद मनपा भुंखडाचा वाद विधानसभेत; नगरविकास मंत्री शिंदे यांचा तथ्य नसल्याचा दावा
- कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी निर्बंध कडक करा; अर्जुन खोतकर यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
- संत नामदेवांच्या जयंतीचा उल्लेख परिपत्रकात करा; वर्षा गायकवाड, राजीव सातव यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- प्रेट्रोल, डिजेल दरवाढीनंतर या कारणामुळे परभणी पुन्हा चर्चेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

