Share

राज्य सरकार डॉक्टरांचा सल्ला घेतंय की कंपाऊंडरचा ? फडणवीस कडाडले

Published On: 

मुंबई : विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन कालपासून सुरु झालं. या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार समोर अडचणींचा डोंगर आहे. कारण सत्ताधारी मंत्र्यांवर लागलेल्या आरोपांवरुन विरोधक सरकारची कोंडी करत असल्याचं दिसून येत आहे.

काल अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आक्रमक झाल्याचं दिसून आलं. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा आणि विदर्भ वैधानिक विकास वैधानिक महामंडळाच्या मुद्द्यावरुन सरकारला धारेवर धरत सभात्याग देखील केला होता. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील भाजप आक्रमक असल्याचं दिसून येत आहे. कोरोना काळातील भ्रष्टाचार, मेट्रो कारशेड, यवतमाळ मधील घोटाळा, विजबिल आदी मुद्द्यांवरून सरकारला घेरलं आहे.

WHO ने कौतुक केल्यानंतर राज्य सरकारने स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेतली मात्र देशातील 34 टक्के मृत्यू राज्यात झाले आहे. शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी WHO बद्दल बोलताना, ‘ही संघटना म्हणजे इकडून तिकडून गोळा केलेली माणसेच आहेत. मी डॉक्टरांपेक्षा कंपाउंडरकडून औषध घेतो,’ असं विधान केलं होतं. याचाच आधार घेत फडणवीसांनी राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. राज्य सरकार हे डॉक्टरांचा सल्ला घेतंय की कंपांडरचा ?’ असा टोला त्यांनी लगावला आहे.

पुढे ते म्हणाले, ‘कशासाठी आपण आपली पाठ आपण थोपटून घेतोय? देशातले 46 टक्के रुग्ण राज्यात आहे. कोरानाबाबत काय चाललंय काही कळत नाही. रुग्ण संख्या खरंच वाढली की अजून काही आहे हे कळत नाही. अमरावतीत लोकांना विचारलं जातंय की अहवाल पॉझिटिव्ह हवाय की निगेटिव्ह ? कोणी मंत्री, अधिकारी जातात आणि लॉकडाऊन करतात. छोट्या व्यापाऱ्यांना काही मदत करणार आहात का? अमरावतीत लॉकडाऊन का केलाय?’ असा सवाल देखील देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!