मुंबई : कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी राज्यासह देशात लॉकडाऊन करण्यात आला होता. या काळात सार्वजनिक वाहतूक देखील पूर्णपणे बंद करण्यात आली होती. तर, मुंबईकरांची लाईफलाइन असलेल्या लोकलची सेवा देखील या काळात बंद करण्यात आली होती. जूनमध्ये काही प्रमाणात लॉकडाऊन उठवल्यानंतर अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु करण्यात आली होती.
यानंतर, राज्य सरकारने महत्वाचं पाऊल उचलत सामान्य महिलांसाठी लोकलचा प्रवास सुरू करून नवरात्रोत्सवाची भेट दिली. मात्र, लोकलने प्रवास करण्याच्या वेळेची मुभा फारशी उपयोगी नसल्याची प्रतिक्रिया अनेक महिलांनी दिली होती. तर, सर्वांसाठी लोकलसेवा सुरु करण्यासाठी ही एक प्रकारची चाचणी असल्याचे बोललले जाऊ लागले होते.
दिवाळीनंतर राज्य सरकार मुंबईकरांना दिलासा देऊ शकते अशी शक्यता होती. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट व वाढती रुग्णसंख्या यामुळे लोकलसेवेसाठी सामान्यांना प्रतीक्षा पाहावी लागली होती. आता मुंबईकरांची ही प्रतीक्षा संपण्याची शक्यता आहे.
येत्या आठवड्यात या संदर्भात महत्त्वपूर्ण पार पडणार आहे. 15 डिसेंबरनंतर सर्वांसाठी लोकलप्रवास खुला करण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. “येत्या आठवड्याच्या शेवटी अर्थात 11-12 डिसेंबरला बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात करोना स्थितीचा आढावा घेऊन लोकल प्रवासाबाबत निर्णय घेण्यात येईल”, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे. यासंदर्भात एबीपी माझाने वृत्त दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
जगभरात भारतात सर्वात जास्त डेटा वापर; लाभ मात्र परदेशी अनेक कंपन्यांना !
औरंगाबादमध्ये मतमोजणीला सुरुवात,बहुरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष
राहुल गांधींच्या नेतृत्त्वाबद्दल शरद पवारांचे मोठं विधान!
‘या दोन तोंडी मांडगुळांची तेव्हा कुठे गेलेली मराठी अस्मिता?’
पुण्यात ओबीसी मोर्चात गोंधळ, समीर भुजबळांसह आंदोलक पोलिसांच्या ताब्यात


