मुंबई:- कोणत्याही पक्षामध्ये त्याच्या नेतृत्वाची मान्यता पक्षात आणि लोकांमध्ये किती असते, हे पाहणे महत्त्वाचे असते. आज काँग्रेसमध्ये रँक अँड फ्रँकटी स्थिती लक्षात घेतली तर आजही गांधी-नेहरू परिवाराबाबतची आस्था काँग्रेसच्या नेत्यांमध्ये पाहण्यास मिळत आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी हे दोघेही त्यांच्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यामुळे बरेच नेते हे त्यांच्या विचारांचे आहेत आणि वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही त्यांच्यामध्ये सातत्याचा थोडासा अभाव आहे असे परखड मत व्यक्त केले आहे. लोकमत दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी हा दावा केला आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या पुस्तकात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया देत म्हणाले की, ‘ओबामा यांनी त्यांची मतं पुस्तकात मांडली आहे. आपली मतं मांडण्याचा सर्वांना अधिकार आहे. त्यांच्या मताशी आता सर्वांनीच सहमत असलं पाहिजे, असंही काही नाही. आपल्या देशातील नेतृत्वाबद्दल आपण बोलू शकतो, पण देशाबाहेरील नेतृत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करण्याची आवश्यकता मला वाटत नाही. असे मत त्यांनी व्यक्त केले.
देशात राहुल गांधी यांचे नेतृत्व मानायला लोक तयार आहे का? असा सवाल केला असता शरद पवार म्हणाले की, ‘त्यांच्यामध्ये काही प्रश्न आहे. राहुल गांधी यांच्या कामात सातत्याचा थोडासा अभाव आहे’ असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या
सहा महिन्यांचे राशन घेऊन आलोय, आता मागे हटणार नाही; द ग्रेट खली आक्रमक!
व्याजदर निर्णयासाठी आरबीआयची बैठक सुरू; विकास दर अंदाजात सुधारणा?
पुणे : भाजपचे संग्राम देशमुख आणि राष्ट्रवादीचे अरुण लाड यांच्यातच प्रमुख लढत
सर्वोत्कृष्ट गीतकार उदित नारायण यांचा ६५ वा जन्मदिवस
धनंजय मुंडे म्हणाले विजय आमचाचं; प्रीतम मुंडे म्हणतात गुलाल आमचाचं!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

