Share

जगभरात भारतात सर्वात जास्त डेटा वापर; लाभ मात्र परदेशी अनेक कंपन्यांना !

Published On: 

नवी दिल्ली: सध्या डेटा हे जगातील सर्वच क्षेत्रांमध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावतो. व्यापार, राजकारण, या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने ग्राहकांचा डेट आणि डेटा वापरणारे ग्राहक या दोन्हींचा मोठ्या प्रमाणात वापर करून भविष्यातील उत्पादनांचं आणि भूमिकांची आखणी केली जाते. भारतीयांचा जगभरात सर्वात जास्त डेटा वापरणाऱ्यांत समावेश होतो. परंतु आमच्या डेटा वापराचा मुख्य लाभ अमेरिकी, युरोपीय, चिनी मीडिया प्लॅटफॉर्मला मोठ्या प्रमाणात होतो. एस्या सेंटरद्वारे तयार करण्यात आलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. २०१९ मध्ये भारतीय लोक दर महिन्याला सरासरी १२ जीबी डेटाचा वापर करत होते. २०२५ पर्यंत हा आकडा प्रति महिना २५ जीबीपर्यंत पोहोचला. परंतु हा डेटा बहुतांश परदेशात होस्ट करणाऱ्या सर्व्हरवर खर्च होताे.

भारतीयांद्वारे होणाऱ्या डेटावरील खर्चाचा अतिशय अल्प वाटा भारतीय उत्पादन किंवा सेवेसाठी वापरला जातो. त्याचा मोठा वाटा अमेरिकी, युरोपीय, चिनी मीडिया प्लॅटफॉर्मला मिळतो. एवढ्या मोठ्या इंटरनेट बाजारपेठेचा योग्य वापर करण्यात भारत त्यादृष्टीने अयशस्वी ठरल्याचे दिसते, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल तयार करण्याच्या प्रकल्पात निर्माता शेखर कपूर यांचाही सहभाग होता. भारतासह संपूर्ण दक्षिण आशियात वापरल्या जाणाऱ्या संकेतस्थळांपैकी केवळ ८.८ टक्के संकेतस्थळांचे होस्ट या दक्षिण आशियात आहेत. म्हणजेच उर्वरित सर्व संकेतस्थळ बाहेरील देशात आहे. पूर्व आशियात ही प्रमाण ४२ टक्के व अमेरिका-कॅनडात ७४.२ टक्के आहे. भारताच्या अंतर्गत मार्केटने परदेशी प्लॅटफॉर्मद्वारे तयार स्थानिक कंटेटला हातोहात घेतले आहे. त्यावरून येथे खूप जास्त क्षमता आहे, हे लक्षात येते. परंतु परदेशी कंपन्या व स्थानिक कंपन्यांत मोठे अंतर आहे. हे अंतर भरून काढण्याची गरज आहे.

या अहवालात आेटीटीबाबत काही वक्तव्य करण्यात आले आहे. उद्योगाने एकजूट होऊन एक निकष तयार करायला हवा. त्याशिवाय ग्राहकांकडे कंटेटबाबत संपूर्ण माहिती व तंत्रज्ञानाचे नियंत्रण असायला हवे. अशा प्रकारच्या संहिता तयार झाल्यास लहान मुलांचाही वाईट आशयापासून बचाव करता येऊ शकेल. माहितीची गुणवत्ता व माहिती तयार करणाऱ्याला जास्तीचे स्वातंत्र्य मिळावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

भारताने आपल्या हार्डवेअर क्षमतेत वाढ करावी. सोबतच भारताच्या क्रिएटिव्ह इंडस्ट्रीला पिछाडलेली असल्याचा शेराही अहवालात देण्यात आला आहे. त्याशिवाय भारत इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीचे व्यापारीकरण व मोनेटायझेशनमध्ये देखील पिछाडीवर आहे. अमेरिका व चीनमध्ये मिळून बनत नाहीत एवढ्या चित्रपटांची निर्मिती भारतात होते. असे असले तरी त्यातून अपेक्षित एवढे उत्पन्न मिळत नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!