पुणे : ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आज पुण्यात माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी बांधवाचा मोर्चा काढण्यात आला आहे. मात्र मोर्चाला पोलिसांची परवानगी नसल्याने शनिवार वाड्यावर पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. परवानगी नसताना मोर्चारचे नेतृत्व करत असलेले माजी खासदार समीर भुजबळ मोर्चा काढण्यावर ठाम होते. मात्र पोलिसांनी समीर भुजबळ यांच्यासह आंदोलांना अटक केली आहे.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी आरक्षण बचाव कृती समिती, पुणे यांच्या वतीने शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय पायी मोर्चा काढण्यात येणार होता. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा पूर्णपणे पाठींबा आहे. मात्र मराठा समाजाला आरक्षण देतांना ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्यात येऊ नये. त्यामुळे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राज्य सरकारने उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकील नियुक्त करणे यासह विविध शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय पुणे मोर्चा काढण्यात येणार होता.
या मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार समीर भुजबळ हे करत आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर या देखील या मोर्चात सहभागी झाल्या आहेत. ओबीसी आरक्षणा विरोधात न्यायालयात करण्यात आलेल्या याचिकेचा निषेध म्हणून तसेच ओबीसी समाजाच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी सदर मोर्चा काढण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
सहा महिन्यांचे राशन घेऊन आलोय, आता मागे हटणार नाही; द ग्रेट खली आक्रमक!
व्याजदर निर्णयासाठी आरबीआयची बैठक सुरू; विकास दर अंदाजात सुधारणा?
पुणे : भाजपचे संग्राम देशमुख आणि राष्ट्रवादीचे अरुण लाड यांच्यातच प्रमुख लढत
‘या दोन तोंडी मांडगुळांची तेव्हा कुठे गेलेली मराठी अस्मिता?’
धनंजय मुंडे म्हणाले विजय आमचाचं; प्रीतम मुंडे म्हणतात गुलाल आमचाचं!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

