Share

औरंगाबादमध्ये मतमोजणीला सुरुवात,बहुरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांचे आज निकाल लागणार आहेत. एक डिसेंबरला पाच मतदारसंघांमध्ये या निवडणुका पार पडल्या होत्या. यामध्ये महाविकास आघाडी आणि भाजपा आमने-सामने उभे होते. पाचही मतदारसंघ महत्त्वाचे असले, तरी पुणे आणि नागपूरच्या निकालांकडे जास्त लक्ष असणार आहे. यासोबतच, आज विधानपरिषदेच्या धुळे-नंदुरबार पोटनिवडणुकींचेही निकाल समोर येणार आहेत.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2020 मतमोजणीस कलाग्राम,एमआयडीसी चिकलठाणा औरंगाबाद सुरवात झाली असून विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर यांनी मतमोजणी संदर्भात मार्गदर्शन केले. यामध्ये सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी औरंगाबाद, रवींद्र बिनवडे, जिल्हाधिकारी जालना, जी.श्रीकांत जिल्हाधिकारी लातूर, राहुल रेखावार जिल्हाधिकारी बीड, खुशालसिंग परदेसी अतिरिक्त जिल्हाधिकारी नांदेड, डॉ.विपीन इटनकर जिल्हाधिकारी नांदेड, डी.एम.मुगळीकर जिल्हाधिकारी परभणी, रुचेश जयवंशी जिल्हाधिकारी हिंगोली, कौस्तुभ दिवेगावकर जिल्हाधिकारी उस्मानाबाद, हे उपस्थित आहेत

औरंगाबाद पदवीधर निवडणुक मतमोजणीला झाली सुरुवात झाली आहे.सुरुवातीला पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी होणार आहे. पहिल्या पसंतीत कुणाचाच विजय नाही झाला तर दुसऱ्या पसंतीची मते मोजली जाणार. 290 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मतमोजणी सुरू आहे. 2 लाख 40 हजार 649 बॅलेट पेपरची मोजणी होणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!