Share

‘या दोन तोंडी मांडगुळांची तेव्हा कुठे गेलेली मराठी अस्मिता?’

Published On: 

🕒 1 min read

सिंधुदुर्ग : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुंबई दौरा चांगलाच गाजला आहे. उत्तर प्रदेशमध्ये रोजगार वाढी व्हावी, गुंतवणूक वाढावी, नव्या योजनांची आखणी आदी विषयांवरून योगी आदित्यनाथ यांनी बॉलिवूड कलाकारांसह अनेक उद्योगपतींची भेट घेतली. त्यांनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला देखील भेट दिली होती.

त्यांच्या मुंबई दौऱ्यावरून महाविकास आघाडीतील पक्षांसह मनसेने देखील टीकास्त्र सोडलं होतं. मुंबईतील रोजगार पळवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप देखील काही नेत्यांनी केला. तर, योगी अपयशी होतील अशी प्रतिक्रिया देखील या नेत्यांनी दिली. तर, भाजप देखील या टीकांना जोरदार प्रत्युत्तर देत आहे.

भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबतच एक फोटो शेअर केला आहे. ममता बॅनर्जी उद्योगपतींच्या भेटीगाठी घेण्यासाठी मुंबईमध्ये आल्या होत्या. तेव्हा त्यांचे स्वागत उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी हॉटेलमध्ये जाऊन केले होते. याचा फोटोच देत त्यांनी ही भेट प्रकाशात आणत त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

‘हेच ते उध्दव ठाकरे आहेत ज्यांनी 2017 साली महाराष्ट्रातील उद्योग बंगाल मधे घेऊन जायला मुंबईत आलेल्या ममता बॅनर्जीचा हॉटेल मधे जावून सत्कार केलेला आणि महाराष्ट्रातील उद्योगपती आणि ममता बॅनर्जीच्या मिटींगला शुभेच्छा दिल्या. तेव्हा कुठ गेलेली मराठी अस्मिता? दोन तोंडी मांडगुळ.’ असा घणाघात निलेश राणे यांनी ट्विटद्वारे केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!