मुंबई: रशिया-युकेन युद्ध अधिक तीव्र होत चालले आहे. त्याचे पडसाद संपूर्ण जगावर उमटत आहेत. त्यात काल (१ मार्च )
युक्रेनची राजधानी कीव्ह शहरावर क्षेपणास्त्रे डागली गेली. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन युक्रेनने अॅडव्हायझरीमधून सर्व भारतीयांना कीव्हमधून बाहेर पडण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान रशियन सैन्याच्या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला. नवीन शेखरप्पा असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. यावरच राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (NCP leader Amol Mitkari) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Prime Minister Narendra Modi) निशाणा साधला आहे.
“युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी राजीनामा देण्याचे धाडस दाखवतील का? की फक्त ‘मन की बात’ मध्ये श्रद्धांजली वाहत बसतील?”, असा खोचक सवाल करत अमोल मिटकरी यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी राजीनामा देण्याचे धाडस दाखवतील का ? की फक्त "मन की बात" मध्ये श्रद्धांजली वाहत बसतील?@narendramodi pic.twitter.com/gKW5wY6dK3
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 2, 2022
दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यावर प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, “युक्रेनमध्ये रशियाच्या हल्ल्यात जीव गमावलेला भारतीय विद्यार्थी नवीन शेखरप्पा यास श्रद्धाजंली अर्पण करतो. अद्यापही रशियात हजारो आपले भारतीय विद्यार्थी अडकले असून ते प्रचंड तणावाखाली आहेत. काहींना जेवणही मिळेना झालं आहे. केंद्र सरकार आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांना विनंती करतो की, त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य समजून घ्यावं, युक्रेनमध्ये अकडलेल्या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची निराशा आणि काळजी समजून घ्यावी. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने आता गतीमान प्रकिया रावबली पाहिजे.”
महत्वाच्या बातम्या:
“राज्याबाहेर काही अघटित घडले की पवारांना कंठ फुटतो”, भातखळकरांचा टोला
खासदार रणजितसिंह निंबाळकरांवर त्यांच्याच कार्यकर्त्यांचा कोट्यवधी फसवणूकीचा आरोप
“बाप-बेटा जेल जाणार सोबतच तीन सेन्ट्रल…”, संजय राऊतांनी पुन्हा केले ट्वीट
प्रसिद्ध उद्योगपती उदय कोटक यांचा पुन्हा आत्मनिर्भर भारताचा धडा ; का म्हणाले ते असं ??


