मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यातील वाद चांगलाच चिघळत आहे. आरोप-प्रत्यारोपाचा हा खेळ आता सेना विरुद्ध भाजप असा संघर्ष तयार झाला आहे. संजय राऊत यांच्यावर सोमय्यांनी वाईन व्यवसाय संबंधी घोटाळा तसेच इतर काही आरोप लावले आहेत. यात राऊतांच्या आप्तेष्टांवरही आरोप ठेवण्यात आले आहेत. तर राऊत यांनी सोमय्या आणि त्यांचे पुत्र यांच्यावर निकॉन कंपनी संबंधी आरोप केले आहेत.
त्यात आज पुन्हा एकदा संजय राऊत यांनी ट्वीट करत सोमय्यांना इशारा दिला आहे. “माझे शब्द अधोरेखित करा.
मी पुनरावृत्ती करतो आहे ‘बाप बेटा जेल जायेंगे’ आणि खात्री बाळगा की, बाप आणि बेटा व्यतिरिक्त ३ सेंट्रल एजन्सी अधिकारी आणि त्यांचे वसुली एजंट देखील तुरुंगात जातील. महाराष्ट्र झुकेगा नाही!”, असे ट्वीट करत राऊतांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे.
Mark my words…
I repeat :
"Bap Beta jail jayenge". Period.And rest assured, apart from Baap & Beta, 3 Central agency officials and their "Vasuli Agents" will also go behind bars.
Maharashtra Jhukega nahi ! pic.twitter.com/4SCyOY4Pna
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 2, 2022
दरम्यान किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या (Nil Somaiya) यांच्या मालकीच्या निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शनमध्ये पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान हे भागीदार असून या प्रकल्पासाठी सोमय्यांनी ४०० कोटींची जमीन साडेचार कोटींमध्ये विकत घेतल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
प्रसिद्ध उद्योगपती उदय कोटक यांचा पुन्हा आत्मनिर्भर भारताचा धडा ; का म्हणाले ते असं ??
Russia vs Ukraine war: युरोपियन युनिअनमध्ये सामील होण्याचा युक्रेनचा अर्ज मान्य
- वय २१ वर्षे, धावा नाबाद ३६५, वेळ ६१४ मिनिट, ‘या’ अष्टपैलूचा विक्रम आजही अबाधित


