Share

प्रसिद्ध उद्योगपती उदय कोटक यांचा पुन्हा आत्मनिर्भर भारताचा धडा ; का म्हणाले ते असं ??  

Published On: 

मुंबई : सध्या युक्रेन आणि रशिया या दोन युरोपीय देशात युद्ध चालू आहे. रशियाचे लष्कर युक्रेनच्या लष्करापेक्षा अधिक बलवान आहे. युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांना आपली लष्करी ताकद ठाऊक असल्याने त्यांनी जगभरातील इतर देशांकडे मदत मागितली होती. मात्र रशियाने दिनांक २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर हल्ला केला तेव्हा जगातील कोणताही देश युक्रेनच्या मदतीला आला नाही.

या उदाहरणावरून भारतातील प्रसिद्ध व्यावसायिक उदय कोटक यांनी ट्विट करत पुन्हा एकदा ‘आत्मनिर्भर भारताचा” धडा गिरवायला लावला आहे. उदय कोटक यांनी ट्विट करत म्हंटल आहे कि , ”आता सध्या जे युद्ध चालू आहे त्यातून आपण सर्वात महत्वाची आणि सर्वात आधी कोणती गोष्ट शिकायला पाहिजे ती म्हणजे ”आत्मनिर्भर” बनण्याची. भारत देशाने शक्य तितक्या सर्वच क्षेत्रात आत्मनिर्भर बनायला पाहिजे असे ते म्हणाले. रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्ध हे भौगोलिक कारणांवरून जास्त लढले जात आहे. आपल्या भारत देशा बाबतीत पण हे महत्वाचे आहे. भारताच्या शेजारी दोन अण्वस्त्रधारी देश आहेत. एका बाजूला आक्रमक चीन आहे तर दुसऱ्या बाजूला सतत खोड्या काढणारा पाकिस्तान आहे. एवढे दुहेरी संकट असताना देखील आपण आजही मोठ्या प्रमाणात लष्करी सामुग्रीसाठी मोठ्या प्रमाणात रशिया आणि अमेरिका या दोन देशांवर अवलंबून आहोत ही कुठेतरी चिंतेची बाब आहे आणि म्हणूनच आपण शक्य तितक्या लवकर सर्वच बाबींमध्ये आत्मनिर्भर बनायला पाहिजे असं उदय कोटक यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे.

महत्वाच्या बातम्या :   

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!