Share

Russia vs Ukraine war: व्लादिमीर पुतीन यांचा जगभरातील नेत्यांना पुन्हा इशारा; म्हणाले आमच्या कारवाईत हस्तक्षेप केल्यास…

Published On: 

नवी दिली : सध्या युरोपात युक्रेन आणि रशिया या दोन देशांमध्ये युद्ध चालू आहे. युक्रेनने NATO (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) या संघटनेमध्ये सहभागी होऊ नये म्हणून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. रशियाच्या बलाढ्य लष्करासमोर युक्रेनचा टिकाव लागणे अवघड आहे.

तरी युक्रेन आपल्या आपल्या परीने रशियाच्या आक्रमणाविरुद्ध लढा देत आहे. युक्रेनची ताकद रशिया पेक्षा कमी असल्याने जगभरातील बलाढ्य देश युक्रेनला अप्रत्यक्ष रित्या मदत करत आहेत. जगातील बलाढ्य देशांकडे अणूबॉम्बची ताकद असल्याने कोणताही देश थेट रशियाशी पंगा घेताना दिसत नाहीये. जर युक्रेनच्या बाजूने कोणताही बलाढ्य देश रशिया विरुद्ध मैदानात उतरला तर जगाला कदाचित अणुयुद्धाला सामोरे जावे लागू शकते.

अश्याच प्रकारची धमकी पुन्हा आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिली आहे. रशियाने २४ फेब्रुवारी रोजी तब्बल दिड लाख  सैन्यबळासह युक्रेनवर हल्ला केला. कोणताही देश थेट युक्रेनला मदत करायचे टाळत असला तरी ; रशियाला आगामी काळात गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल अशी धमकी देत आहे, त्यालाच आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आज प्रत्युत्तर दिले आहे. इंग्लंड आणि अमेरिकेला धमकावताना पुतीन यांनी इशारा दिला आहे. पाश्चिमात्य देशांना इशारा देताना व्लादिमीर पुतीन म्हणाले आहेत कि, ” रशियाच्या कारवाईमध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास त्यांनी यापूर्वी कधीही पाहिले नाही, असे परिणाम होतील. आम्ही आमचं अणुबॉम्ब सांभाळणाऱ्या तुकडीला सज्जतेचे आदेश दिले आहेत त्यामुळे जगातील सर्वच देशांनी सावधान राहायला पाहिजे असा धमकी वजा इशारा व्लादिमीर पुतीन यांनी जगातील बड्या नेत्यांना दिला आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!