सातारा: माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) यांच्यावर त्यांच्याच कार्यकर्त्यांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. दिगंबर आगवणे (Digambar Aagwane) यांनी ही तक्रार सातारा जिल्हा पोलीस प्रमुखांकडे केली असून अजून कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
दरम्यान दिगंबर आगवणे यांनी फलटण शहरातील विविध जमिनींवर काढलेल्या कर्जातील ४ कोटींपेक्षा जास्त रक्कम रणजितसिंह निंबाळकरांच्या खात्यात जमा केली आहे. त्यांनी बँकेच्या सर्व देवाणघेवाणीचे उतारे या तक्रारीबरोबर जोडले आहेत. तसेच आगवणे यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावावरील साखरवाडी येथील जमीन गहाण ठेवून २२६ कोटी रुपयांचे कर्ज काढून दिल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान दिगंबर आगवणे हे गिरवी तालुका फलटण येथील राहणारे आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीत दोन वेळा काँग्रेस आणि एक वेळा भाजप असे तीनदा आपले नशीब आजमावले आहे. तसेच त्यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे कामही बघितले आहे. मात्र अचानक असे आरोप केल्याने मोठी खळबळ माजली आहे. तर दुसरीकडे निंबाळकर यांनी दिगंबर आगवणे यांनी केलेले आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
“बाप-बेटा जेल जाणार सोबतच तीन सेन्ट्रल…”, संजय राऊतांनी पुन्हा केले ट्वीट
प्रसिद्ध उद्योगपती उदय कोटक यांचा पुन्हा आत्मनिर्भर भारताचा धडा ; का म्हणाले ते असं ??
Russia vs Ukraine war: युरोपियन युनिअनमध्ये सामील होण्याचा युक्रेनचा अर्ज मान्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

