मुंबई: रशिया-युकेन युद्ध अधिक तीव्र होत चालले आहे. त्याचे पडसाद संपूर्ण जगावर उमटत आहेत. त्यात काल (१ मार्च )
युक्रेनची राजधानी कीव्ह शहरावर क्षेपणास्त्रे डागली गेली. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन युक्रेनने अॅडव्हायझरीमधून सर्व भारतीयांना कीव्हमधून बाहेर पडण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान रशियन सैन्याच्या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला. नवीन शेखरप्पा असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवारसह (NCP President MP Sharad) देशभरातून शोक आणि संताप व्यक्त करण्यात आला.
मात्र यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. “परिस्थितीचं गांभीर्य समजून घ्या असे म्हणत भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर शरद पवार संतापले म्हणे. गेले ४ महिने चाललेल्या संपात जवळपास ९० एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे त्याच्यावर मात्र शरद पवार एक अक्षरही बोललेले नाहीत. राज्याबाहेर काही अघटित घडले की पवारांना कंठ फुटतो.”, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.
परिस्थितीचं गांभीर्य समजून घ्या असे म्हणत भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर शरद पवार संतापले म्हणे.
गेले ४ महिने चाललेल्या संपात जवळपास ९० एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केले आहे त्याच्यावर मात्र शरद पवार एक अक्षरही बोललेले नाहीत.
राज्याबाहेर काही अघटित घडले की पवारांना कंठ फुटतो. pic.twitter.com/XMOT0fbYhD— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 2, 2022
काय म्हणाले होते शरद पवार?
“युक्रेनमध्ये रशियाच्या हल्ल्यात जीव गमावलेला भारतीय विद्यार्थी नवीन शेखरप्पा यास श्रद्धाजंली अर्पण करतो. अद्यापही रशियात हजारो आपले भारतीय विद्यार्थी अडकले असून ते प्रचंड तणावाखाली आहेत. काहींना जेवणही मिळेना झालं आहे. केंद्र सरकार आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांना विनंती करतो की, त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य समजून घ्यावं, युक्रेनमध्ये अकडलेल्या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची निराशा आणि काळजी समजून घ्यावी. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने आता गतीमान प्रकिया रावबली पाहिजे.”असे शरद पवार यांनी म्हटले होते.
महत्वाच्या बातम्या:
खासदार रणजितसिंह निंबाळकरांवर त्यांच्याच कार्यकर्त्यांचा कोट्यवधी फसवणूकीचा आरोप
“बाप-बेटा जेल जाणार सोबतच तीन सेन्ट्रल…”, संजय राऊतांनी पुन्हा केले ट्वीट
प्रसिद्ध उद्योगपती उदय कोटक यांचा पुन्हा आत्मनिर्भर भारताचा धडा ; का म्हणाले ते असं ??
Russia vs Ukraine war: युरोपियन युनिअनमध्ये सामील होण्याचा युक्रेनचा अर्ज मान्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

