Share

१ जूननंतर राज्यातील लॉकडाऊन वाढणार ? अजित पवार म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

पुणे : राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या कालावधीत दि. १ जून २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान, राज्यामध्ये करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा काहीसा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये घट होत असून कोरोना मुक्तांचा आकडा हा अधिक आहे. मात्र, अद्यापही राज्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या हि चार लाखांपार असून दररोज रुग्णांमध्ये होणारी वाढ ही देखील आटोक्याबाहेर आहे. अशातच, तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला असून लहान वयोगटातील मुला-मुलींना अधिक धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर आता राज्यातील निर्बंध पुन्हा १ जूननंतर वाढणार की काही दिलासा मिळणार याकडं राज्यातील जनतेचं लक्ष्य लागलं आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्याच्या आढावा बैठकीनंतर लॉकडाऊनबाबत भाष्य केलं आहे.

‘आज २१ मे आहे, १ जूनच्या सकाळी ७ वाजेपर्यंत आपण लॉकडाऊन कायम ठेवला आहे. लॉकडाऊन केल्याचे चांगले परिणाम पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दिसून आले आहेत. त्यामुळे पुढे काय करायचं याचा निर्णय अद्याप झालेला नाही. योग्य वेळी त्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल. आणखी दहा दिवस आपल्या हातात आहेत. त्यानंतर काय निर्णय करायचा ते पाहू,’ असं अजित पवार म्हटले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!