मोहोळ – इंदापूरला पळवलेल्या पाच टीएमसी पाण्याबाबत २२ एप्रिल २०२१ रोजी महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा विभागाने कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना जो आदेश दिला होता तो आदेश शेटफळ गडे कालव्यामध्ये ५ पाच टी.एम.सी पाणी उजनी जलाशयातून उचलण्याच्या प्रकल्प सर्वेक्षणाचा होता आणि तो निर्णय रद्द करण्याची घोषणा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.परंतु सर्वेक्षणाचा आदेश रद्द न करता इंदापूरला उजनी जलाशयातून देण्यात येणाऱ्या पाच टीएमसी पाण्याची प्रशासकीय मान्यता रद्द करावी आणि तो मुळ प्रकल्प रद्द करावा अशी मागणी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण उजनी पाणी बचाव संघर्ष समितीचे निमंत्रक नागेश वनकळसे यांनी केली.
याबाबत सविस्तर आपली भूमिका स्पष्ट करताना नागेश वनकळसे म्हणाले की, २२एप्रिल रोजी उजनीचे पाणी शेटफळ गडे उपसा सिंचन योजना प्रकल्पासाठी सर्वेक्षणाचा जो निर्णय झाला होता आणि त्याचे पत्र प्रसारमाध्यमांमध्ये पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून प्रसारित झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी जागा झाला आणि इंदापूरला देण्यात येणाऱ्या पाच टीएमसी पाण्याबाबत सोलापूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली त्यानंतर जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील यांनी २२ एप्रिलचा इंदापूरच्या पाण्याबाबत चा सर्वेक्षणाचा निर्णय रद्द करत असल्याचे जाहीर केले परंतु हा रद्द केलेला निर्णय दिशाभूल करणारा असून सोलापूर जिल्ह्याच्या आणि उजनी जलाशयाच्या मुळावर येणाऱ्या या प्रकल्पाची मंजुरी रद्द करण्याची मागणी आम्ही करत आहोत असे त्यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले, जिल्ह्यातील वातावरण शांत झाल्यानंतर अंतर्गत निर्णय होऊन इंदापूर चे सर्वेक्षण परत होऊ शकते, आणि आणि सर्वेक्षण रद्द करण्यापेक्षा उजनी जलाशया मध्ये पाणी शिल्लक नाही, उजनी जलाशयात कुठलेही सांडपाणी येत नाही त्यामुळे इंदापूरला देण्यात येणाऱ्या पाच टीएमसी पाण्याची योजना व्यवहार्य नाही त्यामुळे सदर प्रकल्पाची शासनाने जी मंजुरी दिलेली आहे ती रद्द करावी तो मूळ प्रकल्प रद्द करावा त्यावेळीच शेतकरी बांधवांचा विश्वास बसेल असे मत नागेश वनकळसे यांनी व्यक्त केले.
उजनी जलाशयाचे पूर्णता पाणी वाटप झालेले असून कोणतेही पाणी शिल्लक नसल्यामुळे भविष्यकाळात राजकीय नेत्यांनी आपली ताकद वापरून शब्दांची मोडतोड करून उजनी धरणाच्या पाण्यावर डल्ला मारू नये, तसेच अपूर्ण प्रकल्प पूर्ण करावेत त्याशिवाय कोणतीही योजना मंजूर करण्यात येऊ नये सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या वाट्याचे पाणी त्याच्या तालुक्याला मिळावे यासाठी न्यायालयीन लढा लढावाच लागणार असल्याचे श्री वनकळसे म्हणाले त्यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायतींनी व शेतकऱ्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.याप्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक अशोक भोसले, महादेव गोडसे, विधिज्ञ श्रीरंग लाळे, यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- अक्षय कुमारच्या मदतीने मराठवाड्यात पहिली मोबाईल आरटीपीसीआर टेस्ट व्हॅन उपलब्ध
- खतांची दरवाढ मागे; ‘केंद्राचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा’, प्रीतम मुंडेंकडून स्वागत
- ‘..त्यामुळेच माध्यमांकडून मुख्यमंत्री ठाकरेंचा पाठलाग सुरू’, भाजप नेत्याचा गंभीर आरोप
- आता उद्धव ठाकरेंचे पाय जमिनीवर आले, आनंद आहे; चंद्रकांत पाटलांचा टोला
- ‘दीड वर्षात राज्य सरकारने बारा बलुतेदारांना, लोक कलावंताना काहीही मदत केली नाही’


