मुंबई : महाराष्ट्रामध्ये ‘तौक्ते’ चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. गोव्याकडून आलेलं हे वादळ जरी कोकण किनारपट्टीच्या बाजूने सरकलं असलं तरी कोकणातील गावांसह पश्चिम महाराष्ट्रात देखील सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान केलं आहे. पुढे हे तौत्के चक्रीवादळ सौराष्ट्रच्या किनारपट्टीजवळ गुजरातमध्ये धडकले.
तौत्के चक्रीवादळाचा गुजरातला जोरदार तडाखा बसल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादळग्रस्त भागाची बुधवारी दुपारी पाहणी केली. या दौऱ्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी गुजरातसाठी तब्बल एक हजार कोटींच्या मदतनिधीची घोषणा केली आहे. परंतु पंतप्रधान मोदींनी गुजरातला मदत केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पुणे येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले कि, ‘चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाबद्दल मदत जाहीर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या बाबतीत दुजाभाव केलेला नाही. गुजरातचा पाहणी दौरा केल्यानंतर त्यांनी चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या सर्वच राज्यातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपये मदत जाहीर केली तसेच सर्व संबंधित राज्यांना मदतीसाठीचे प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली आहे.’ असे मत चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी गुजरातमधील नुकसानाची हवाई पाहणी केल्यानंतर जी मदत जाहीर केली ती संपूर्ण देशासाठी आहे. चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान ही राज्ये तसेच दमण आणि दीव तसेच दादरा आणि नगर हवेली हे दोन केंद्रशासित प्रदेश यामधील वादळाच्या तडाख्यामुळे मरण पावलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर गंभीर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपये अशी मदत पंतप्रधानांनी जाहीर केली.
तसेच या सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना वादळामुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण करून अहवाल पाठविल्यानंतर तातडीने आर्थिक मदत देण्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिलेली आहे. पंतप्रधानांनी महाराष्ट्र किंवा कोणत्याही राज्याच्या बाबतीत भेदभाव केलेला नाही.’ असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘फडणवीसांना गोवा, युपी आणि गुजरातमध्ये पाठवावं, महाराष्ट्रात त्यांची आवश्यकता नाही’
- अक्षय कुमारच्या मदतीने मराठवाड्यात पहिली मोबाईल आरटीपीसीआर टेस्ट व्हॅन उपलब्ध
- खाकीला काळीमा! ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी डीवायएसपी खिरडकरने घेतले दोन लाख
- शरद पवार यांच्या धोरणामुळेच खत दरवाढ झाली होती ; भाजपचा दावा
- आजच्या डिजीटल भारताची पायाभरणी ही राजीव गांधी यांनी केली – नाना पटोले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
