Share

‘महाराज, मोदींना आग्रा दरबारातील शिवशक्तीचा प्रत्यय पुन्हा दाखवण्याची वेळ आलीये!’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहेत. यातच आता भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज आपली बेधडक भूमिका मांडली आहे. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले, त्यावर त्यांची भूमिका काय आहे, याकडे सर्वांच लक्ष होतं. त्यावरच त्यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत घेऊन आपली भूमिका मांडली.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट हवी होती. त्यासाठी मी चारवेळेला पंतप्रधान मोदींना पत्रही दिले. मात्र, अद्याप त्यांनी मला भेटीसाठी वेळ दिलेली नाही, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.

यानंतर मराठा समाजामधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसनेही यावर भाष्य केले आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियाद्वारे संभाजीराजेंना एक आवाहन केले आहे. ‘मोदींना आग्रा दरबारातील शिवशक्तीचा प्रत्यय पुन्हा दाखवण्याची वेळ आलीये’ असे ट्विट मिटकरी यांनी केलेय.

‘महाराज साहेब नरेंद्र मोदींना महाराष्ट्राचे, मराठा आरक्षणाचे काही गांभीर्य नव्हतेच. आता यांना आग्रा दरबारातील शिवशक्तीचा परत एकदा प्रत्यय दाखवण्याची वेळ आली आहे. आपण आमचा स्वाभिमान आहात.’ असे म्हणत संभाजीराजेंच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी असल्याचे सांगितले आहे.

संभाजीराजेंचा भाजपला इशारा
मराठा आरक्षणासंदर्भात भाजपने त्यांची भूमिका घ्यावी. मी काही त्यांचा ठेका घेतलेला नाही. भाजपने मराठा समाजाच्या भावनेशी खेळू नये, यावर तोडगा सांगावा. मी शांत आहे, ही महाराजांची शिकवण आहे. मी आक्रमक होणार याआधी मार्ग काय काढणार, हे सांगा. सध्या मी महाराष्ट्र पिंजून काढतो आहे. अभ्यासू लोकांशी चर्चा करतो आहे. २७ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षांना भेटणार आहे. त्यानंतर त्याच दिवशी मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे. सगळ्या आमदार आणि खासदारांना माझी वॉर्निंग आहे, मराठी समाजाला विनंती आहे की, २७ मे पर्यंत शांत राहा असं आवाहनही त्यांनी केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!